
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (डब्ल्यूटीसी) फायनल 7 ते 11 जूनदरम्यान इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी ही घोषणा केली. या अंतिम लढतीसाठी 12 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
डब्ल्यूटीसी स्पर्धेचा हे दुसरे सत्र होय. पहिल्या सत्रात केन विल्यम्सनच्या न्यूझीलंडने विजेतेपद पटकाविले होते. त्यांनी किताबी लढतीत हिंदुस्थानवर 8 गडी राखून विजय मिळविला होता. यंदाच्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ दाखल होऊ शकतो, मात्र दुसऱया स्थानासाठी हिंदुस्थानसह दक्षिण आफ्रिका व श्रीलंका या देशांमध्ये चुरस आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत हिंदुस्थानने बाजी मारल्यास मग ऑस्ट्रेलिया-हिंदुस्थानदरम्यान डब्ल्यूटीसी फायनल रंगण्याची दाट शक्यता आहे.