
सामना ऑनलाईन । भोपाळ
मध्यप्रदेशमधील एका भाजप नेत्याच्या घरी अवैध शस्त्रसाठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. संजय यादव असं या भाजप नेत्याचं नाव आहे. मध्य प्रदेशमधील सेंधवा येथे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत हा शस्त्रसाठा सापडला आहे.
जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांना यादव याच्या घरात अवैध शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी यादव याच्या घरावर धाड टाकली. या धाडीत त्याच्या घरातून 13 पिस्तुलं, 17 देशी बॉम्ब, 116 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली.
पोलिसांनी संजय यादव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याखेरीज यादव याच्यावर धमकावणे, मारहाण करणे असेही आरोप आहेत. या आरोपांखाली यादव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. यादव याच्या विरोधात आत्तापर्यंत 47 गुन्हे दाखल आहेत. सध्या यादव फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

























































