लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 51 दारू विक्रेत्यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नगर व शिर्डी लोकसभेची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून नगर जिल्ह्यात अवैद्य दारू विक्री धंद्यावर 59 ठिकाणी छापे टाकून 51 दारू विक्रेत्यांना अटक केली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी तसेच राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागयी उपायुक्त अर्जुन ओहोळ यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उल्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. पाच विभागामध्ये 2 भरारी पथकांनी मोहीम हाती घेऊन 51 आरोपींना अटक केली असून यांच्याकडून 447 लिटर हातभट्टीवरील दारू, तसेच 4036 लिटर रसायन, 240 लिटर देशी दारू व 50 लिटर देशी मद्य, 22 लिटर बिअर, 12 लिटर विदेशी मद्य, 90 लिटर ताडी, 3 दुचाकी वाहने असा रुपये 3 लाख 85 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कारवाई जिल्हाधिकारी आणि उत्पादन शुल्क अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक राज्य उत्पादन शुल्कचे पराग नवलकर व सी.पी.निकम यांचे नेतृत्त्वाखाली करण्यात आली आहे.