
सामना प्रतिनिधी । नगर
शेवगाव तालुक्यातील ढोर नदीपात्रामध्ये अवैध वाळू उपसा करताना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी आरबाज पठाण वय 30, राहणार शेवगाव याला अटक केली आहे. अब्दुल सलिम शेख हा फरार आहे.
अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाल्यानंतर ढोल नदीपात्रामध्ये अवैध वाळू उपसा करताना पथकाने छापा मारला. त्या छाप्यात एक ट्रॅक्टर, एक ट्रॉली व एक ब्रास वाळू या ठिकाणाहून हस्तगत केली.
गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस रवींद्र कर्डिले, सचिन आडवल, दत्तात्रय गव्हाणे, विनोद मासाळकर ,रोहित मिसाळ प्रकाश वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.



























































