
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर मनसे जिल्हा उपाध्यक्ष व सरपंच प्रशांत कोल्हे यांच्या सह सभापती पुंढलीक चोखे, मनसे शहर अध्यक्ष (चिमूर) नितीन लोणारे, उपाध्यक्ष संजय वाकडे, विभाग अध्यक्ष मंगेश ठोंबरे व अनेक चिमूर मधील मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख प्रशांत कदम, शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे, युवासेना जिल्हाप्रमुख मनीष जेठाणी उपस्थित होते.



























































