कोरियाची जपानवर मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या सलामीच्या सामन्यात पराभवाची झळ बसलेल्या कोरिया आणि जपान यांच्यातील लढत जोरदार झाली. सामन्याच्या पहिल्या मिनिटालाच मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर नागायोशी केनने गोल ठोकून जपानला भन्नाट सुरुवात करून दिली, पण कोरियन जुंगजुन लीने पुढच्या 23 मिनिटांत दोन मैदानी गोल ठोकत आघाडी मिळविली आणि ती आघाडी पुढच्या दोन सत्रातही कायम राखली. या आघाडीमुळे कोरियाने हॉकी वर्ल्ड कपमधील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली.

स्पर्धेत आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी ‘ब’ गटात कोरिया आणि जपानला विजयाची गरज होती. जपानने पहिल्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळविला आणि केन नागायोशीने सुसाट गोल ठोकत जपानला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. या गोलमुळे जपान सुरुवातीपासूनच आक्रमक दिसत होता, तर कोरियासुद्धा जपानला झुंज देत होता. कोरियन जुंगजुन लीने जपानला फारवेळ आघाडीचे सुख दिले नाही.