उत्तर प्रदेशात महिलांना रात्री डय़ुटी करता येणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशात आता महिलांना रात्री सात ते सकाळी सहा या वेळेत सरकारी किंवा खासगी कार्यालयांत, उद्योगात डय़ुटी करता येणार नाही. याबाबतचे आदेश योगी सरकारने काढले आहेत. तसेच एखाद्या ठिकाणी महिलेने रात्री डय़ुटी करणे आवश्यक असेल तर त्याबाबत सबंधित महिला कर्मचाऱयाची लेखी सहमती घेणे बंधनकारक आहे. परवानगीशिवाय महिलेला डय़ुटी करावी लागल्यास संबंधित आस्थापनेवर कारवाई केली जाईल. तसेच एखाद्या महिला कर्मचाऱयाने रात्री डय़ुटी करण्यास नकार दिल्यास तिला कामावरून काढून टाकता येणार नाही, असे अप्पर मुख्य सचिव श्रम सुरेश चन्द्रा यांनी स्पष्ट केले आहे.