…तर पुन्हा ऑनलाइन सुनावणी घेऊ! हायकोर्टातील वाढत्या गर्दीची न्यायमूर्तींना चिंता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-highcourt

मुंबईत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने संसर्ग पुन्हा वाढत आहे. न्यायालयातही सुनावणीसाठी येणाऱया नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या गर्दीची गंभीर दखल न्यायमूर्तींनी घेतली आहे. कोर्टात जर समाजिक अंतराचे भान राखले नाही तर पुन्हा व्हर्च्युअल सुनावणीचा पर्याय निवडावा लागेल, असा इशारा न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी दिला असून याबाबत त्यांनी नोटीस प्रसिद्ध केली आहे. वकील, याचिकाकर्ते आणि पक्षकार कोरोनाविषयक नियमावलींचे काटेकोरपणे पालन करत नसल्याचे वारंवार निदर्शनास येत असल्याने न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी याबाबत चिंता व्यक्त करत एक नोटीस जारी केली आहे.