सिराजला ‘ब्राऊन मंकी’ म्हणून हिणवणाऱया हुल्लडबाजांची हकालपट्टी, ऑस्टेलियात भर सामन्यात राडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सिडनी कसोटीत चौथ्या दिवशीच्या खेळात ऑस्टेलियन हुल्लडबाजांनी स्टँडमधून थेट हिंदुस्थानी वेगवान गोलंदाज सिराज अहमदला सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना पुन्हा वर्णद्वेषी शेरेबाजीचे लक्ष्य बनवले. सिराजला ब्राऊन मंकी आणि बिग डॉग असे हिणवत त्याच्याविरुद्ध वर्णद्वेषी शेरेबाजी केली. त्यामुळे सिराजला थेट पंच आणि कर्णधार अजिंक्य रहाणेकडे या लाजिरवाण्या प्रकारची तक्रार करावी लागली.

त्यानंतर लढत काही मिनिटे थांबल्यावर पोलिसांनी स्टेडियममधे प्रवेश करीत सिराजला लक्ष्य करणाऱया सहा गाऱया हुल्लडबाज युवकांची स्टँडमधूनच हकालपट्टी केली. या प्रकाराने आपण व्यथित झालो असून आम्ही हिंदुस्थानी नियामक मंडळाची (बीसीसीआय) जाहीर माफी मागतो, असे निवेदनच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने काढले.

सिडनी कसोटी लढतीच्या चौथ्या दिवशीही सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावर हिंदुस्थानी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. मैदानावर घडलेल्या या प्रकाराबाबत हिंदुस्थानी क्रिकेट संघाने पंचांकडे औपचारिक तक्रार नोंदवली. त्यानंतर चौथ्या दिवशीही चालू क्रिकेट सामन्यात काही चाहत्यांनी त्याच प्रकाराची पुनरावृत्ती केली.

सिराज सीमारेषेवर फिल्डिंग करत असताना हा प्रकार घडला. त्याने सुरुवातीला दुर्लक्ष केले, पण त्यांच्याकडून वर्णद्वेषी टीका थांबत नाही हे पाहिल्यानंतर त्याने थेट कर्णधार अजिंक्य रहाणे आणि पंचांच्या कानावर ही बाब घातली. त्यानंतर बराच काळ खेळ थांबवण्यात आला होता. अखेर पोलिसांनी हुल्लडबाज युवकांची गचांडी धरत त्यांना थेट स्टेडियमबाहेर काढल्यावर लढतीचा खेळ पुन्हा सुरू झाला.

घडलेल्या प्रकारात कर्णधार अजिंक्य रहाणे आणि संपूर्ण हिंदुस्थानी संघ सिराजच्या पाठीशी उभा राहिल्याचे दिसल्याने सर्वानीच टीम इंडियाचं कौतुक केले. हिंदुस्थानी क्रिकेटपटूंवर ऑस्टेलियन हुल्लडबाजांनी केलेल्या वर्णद्वेषी शेरेबाजीचा हिंदुस्थानच्या आजी-माजी क्रिकेटपटूंनी तीव्र निषेध केला आहे