हिंदुस्थानातील सर्वात सुंदर बावडी

4294

हिंदुस्थानात बावडी निर्माण होण्या मागे मोठा इतिहास आहे. बावडी एक वास्तुकला आहे.पायऱ्यांनी बनलेली विहीर म्हणजे बावडी. त्याला वाव किंवा बाउली असे ही म्हटले जाते. आकर्षक कलाकृतीने बनलेल्या बावडया गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान अश्या उष्णकटिबंधीय प्रदेशात दिसून येतात. पुरातन कालीन बावड्यांची रचना वेगळ्या पध्दतीच्या होत्या. बावड्याची निर्मिती ही वेगवेगळ्या कारणांसाठी केली जात होती. स्नान करण्यासाठी, धार्मिक विधींसाठी बावड्या तयार केल्या जायच्या. दरम्यान, अनेक जण असाही दावा करतात की, या बाबड्याच्या आत खजिने दडलेले असायचे.

चांद बावडी, अभनेरी, राजस्थानchand-baoli

हिंदुस्थानातील सर्वात सुंदर व खोल बावडी ही राजस्थानातील अभनेरी या ठिकाणी आहे. राजस्थान हा वाळवंटी प्रदेश असल्या कारण बावडींची निर्मिती केली. ही जगातील सर्वात खोल अशी बावडी चारी बाजुंनी 35 मीटर रुंद आहे. पाणी कितीही खोल असले तरी या बावडीतून पाणी काढणे अगदी सोपे आहे. 70 फुट अशी रुंद असलेल्या ह्या बावडीला चक्रव्युवच्या स्वरुपात 1300 पायऱ्या आहेत. या पायऱ्या आकर्षक कलाकृतीने बांधले गेले आहे.

राणी की वाव, पाटण, गुजरात rajon-ki-baoli

2018 रोजी, भारतीय रिजर्व बँकेने 100 रुपयाच्या नोट वर राणी की वाव चे चित्रण केले त्याचप्रमाणे  2014 रोजी युनेस्को ने जागतिक वारसा म्हणून घोषित केले.सरस्वती नदीच्या काठी ही बावडी आहे. ही बावडी 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद तसेच 27 मीटर खोल आहे.

अर्गेसन की बाउली, दिल्लीagr

पायऱ्यांनी बनलेली ही बावडी नवी दिल्ली येथे आहे. 14 व्या शतकात महाराजा अग्रसेनने बनवले. याचे बांधकाम लाल वाळूच्या खडकाने केले आहे. ही बावडी उत्तर पासून ते दक्षिण दिशा पर्यंत सुमारे 60 मीटर लांब आणि 15 मीटर उंच आहे. यांची निर्मीती ही महाभारताच्या वेळी केली या नंतर 14 व्या शतका अग्रवाल समाजने ह्या बावडीचे नुतनीकरण केले असे माणले जाते. Archeological survey of India आणि अवशेष अभिनियम 1958 अंतर्गत हिंदस्थान सरकारद्वारे संरक्षित आहे.

अदलाज वाव, गुजरात

adlaj

पाणी साठवून ठेवण्यासाठी बावडी किंवा वावची निर्मिती केली गेली. गुजरात राज्यातील अहमदाबाद पासून 18 किलोमीटर दुर अदलाज वाव आहे. मानव निर्मीत या अद्भुत कलाकृतीला  Archeological survey of India ने संरक्षित केले गेले आहे. 16 स्तंभाने उभारलेली असून या बावडीला 5 मजले आहेत व त्याला अष्टभुजाकार आकार दिला आहे. या वावच्या पहिल्याच मजल्यावर मंदीराचे बांधकाम केले आहे. तर भिंतीवर कलाकृती केली आहे

सुर्य कुंड बावडी मोढेरा, गुजरात2

सोलंकी भीमदेवने या मंदिराची निर्मीती केली.या मंदीराचे तीन वेगवेगळे भाग आहे.तिसऱ्या भागात रामकुंड म्हणजे सुर्यकुंड आहे. सुर्य कुंडच्या पायऱ्या ह्या आगळया वेगळ्या पध्दतीने बनवले आहे.याची कलाकृती आकर्षित व अगम्य आहे. मोढेरा सुर्यमंदिर हे सर्वात अद्भुत मंदिर आहे.51 फुट लांब आणि 25 फु़ट रुंद आहे. आणि या स्तंभाला रामायण, महाभारताचे काही दृश्य रेखाटले आहे. स्थापत्य कला किंवा शिल्पकलाचा नमुना आहे.51 फुट लांब आणि 25 फु़ट रुंद आहे.

राजों की बाउली, दिल्लीrani-kivaav

मैहरोली पुरातत्व उद्यानात राजोन ची बाउली सोळाव्या शतकात बवलेली आहे.दौलत खान यांनी गवंडी कामासाठी याचे बांधकाम केले. या बावडीत एक मशिद आहे. पुर्वी एकाग्रतेसाठी या मशिद चा वापर केला जायचा.राजों की बाउलीची रचना ही आयताकृती आहे.

हंप्पी,कर्नाटक humppy

बावडी ही उत्तर भारतीयांची हंप्पी परंपरा आहे, परंतु कर्नाटक विजयनगर येथे असलेले हंप्पी हे कुंडाच्या रचनेत बनलेले आहे. भारताच्या ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. हंप्पी हे तुगभद्रा नदीच्या काठी आहे. युनेस्को ने जागतिक वारसा म्हणून घोषित केले. येथे पाचशे पेक्षा अधिक स्मारके आहे

 

आपली प्रतिक्रिया द्या