कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट, 24 तासात आढळले 41 हजारहून अधिक रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट होत आहे. गेल्या दोन दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती.

गेल्या काही दिवसांत सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत आहे. गेल्या 24 तासात 41 हजार 692 रुग्ण सापडले आहेत. असे असले तरी गेल्या 24 तासात 42 हजार ३17 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 450 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 3 ऑक्टोबरपासून सक्रिय रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे.

देशात एकूण रुग्णांची संख्या 88 लाख 14 हजारवर पोहोचली आहे. असे असले तरी आतापर्यंत 82 लाखहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत 1 लाख 29 हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.