
गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 45 हजारहून अधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 79 लाखांच्यावर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा कमी होत आहे.
#COVID19 India Tracker
(As on 26 October, 2020, 08:00 AM)➡️Confirmed cases: 79,09,959
➡️Recovered: 71,37,228 (90.23%)
➡️Active cases: 6,53,717 (8.26%)
➡️Deaths: 1,19,014 (1.50%)#IndiaFightsCorona#IndiaWillWin#StaySafe pic.twitter.com/bILW929IDp— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) October 26, 2020
कोरोना रुग्ण
गेल्या 24 तासात देशात 45 हजार 149 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 79 लाख 9 हजार 960 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात 480 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
#CoronaVirusUpdates:#COVID19 testing status update:@ICMRDELHI stated that 10,34,62,778 samples tested upto October 25, 2020.
09,39,309 samples tested on October 25, 2020.#StaySafe #Unite2FightCorona #IndiaWillWin pic.twitter.com/5qmEfjNb3w
— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) October 26, 2020
सहा लाखहून अधिक सक्रिय रुग्ण
आतापर्यंत 71 लाख 37 हजार 229 रुग्ण बरे झाले आहेत. देशात सध्या 6 लाख 53 हजार 717 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
State-wise details of Total Confirmed #COVID19 cases
(till 26 October, 2020, 8 AM)➡️States with 1-25000 confirmed cases
➡️States with 25001-200000 confirmed cases
➡️States with 200000+ confirmed cases
➡️Total no. of confirmed cases so far #StaySafe pic.twitter.com/jpcfDyJtqY— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) October 26, 2020
एक लाखहून अधिक मृत्यू
गेल्या 24 तासात 480 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 1 लाख 19 हजार 14 वर पोहोचला आहे.
घटत असलेला मृत्यूदर
देशातील 14 राज्य आणि केंद्रशासित राज्यात मृत्यू दर 1 टक्क्यांहून कमी झाला आहे. पंजाबमध्ये सर्वाधिक मृत्यूदर 3.14 टक्के असून महाराष्ट्रात हा दर 2.63 टक्के आहे. मिझोरम हे एकमेव राज्य आहे जिथे कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. मिझोरमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 2 हजार 477 वर पोहोचला असून राज्यात कोरोना बर्याापैकी आटोक्यात आणण्यात यश आले आहे.
बरे होण्याचे प्रमाण आणि लागण होण्याचे प्रमाण
गेल्या 5 दिवसांत कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 2 टक्क्यांनी वाढले आहे. 19 ऑक्टोबर रोजी कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे 87 टक्के होते ते आता 89.74 टक्क्यांवर पोहोचलेअ आहे. गेल्या 3 दिवसांत कोरोना लागण होण्याचे प्रमाण घटले आहे. 58 हजारांनी हे प्रमाण घटले आहे.

























































