सर्वात मोठी कौशल्‍य स्‍पर्धा ‘इंडियास्किल्‍स 2021’साठी नोंदणी सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातील व्‍यावसायिक प्रशिक्षणाच्‍या आंतरराष्‍ट्रीय मानकांना चालना देण्‍यासाठी नॅशनल स्किल डेव्‍हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) या मिनिस्‍ट्री ऑफ स्किल डेव्‍हलपमेंट अॅण्‍ड आंत्रेप्रीन्‍युअरशीप (एमएसडीई), भारत सरकारच्‍या कार्यकारी शाखेने आज इंडियास्किल्‍स कॉम्‍पीटिशन 2021 साठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाल्‍याची घोषणा केली. ही द्विवार्षिक स्‍पर्धा देशभरातील प्रतिभांना मार्गदर्शन करण्‍यासोबत राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय व्‍यासपीठांवर त्‍यांची कौशल्‍ये दाखवण्‍यासाठी एक व्‍यासपीठ देण्‍यासाठी आयोजित केली जाते. उमेदवार राज्‍य स्‍पर्धेसाठी ऑनलाइन https://worldskillsindia.co.in/indiaskill2021/ येथे नोंदणी करू शकतात.

नोंदणीकृत उमेदवारांना राज्‍य, प्रादेशिक व राष्‍ट्रीय पातळीवरील स्‍पर्धांमध्‍ये पेन्टिंग ते मेसोन्री, वेब तंत्रज्ञान ते फॅशन तंत्रज्ञान अशा ४७ कौशल्‍यांमधील त्‍यांची प्रतिभा दाखवण्‍याची संधी मिळेल. या स्‍पर्धेसाठी पात्रता निकष असे आहेत की, उमेदवार सर्व कौशल्‍यांसाठी १ जानेवारी १९९९ रोजी किंवा त्‍यानंतर जन्‍मलेला असावा. पण मेकॅट्रॉनिक्‍स, क्‍लाऊड कम्‍प्‍युटिंग, सायबर सिक्‍युरिटी, वॉटर टेक्‍नोलॉजी आणि इन्‍फॉर्मेशन नेटवर्क के‍बलिंगसाठी उमेदवार १ जानेवारी १९९६ रोजी किंवा त्‍यानंतर जन्‍मलेला असावा.

नोंदणी प्रक्रिया २८ फेब्रुवारी २०२१ रोजी समाप्‍त होईल. नोंदणी प्रक्रिया समाप्‍त झाल्‍यानंतर स्किल स्‍पर्धा जिल्‍हा, राज्‍य व प्रादेशिक पातळीवर आयोजित करण्‍यात येतील. स्‍पर्धांचा प्रादेशिक टप्‍पा पाच विभागांमध्‍ये आयोजित करण्‍यात येईल आणि दिल्‍लीमधील राष्‍ट्रीय स्‍पर्धेसह समाप्‍त होईल. या स्‍पर्धा राज्‍यांद्वारे आयोजित करण्‍यात येतील आणि सेक्‍टर स्किल कौन्सिल्‍स, इंडस्‍ट्री पार्टनर्स, कॉर्पोरेट्स व अकॅडेमिक ऑर्गनायझेशन्‍सच्‍या सहयोगाने राष्‍ट्रीय कौशल्‍य विकास महामंडळाचे पाठबळ असेल.

उमेदवारांसाठी सूचना:

  • इंडियास्किल्‍स २०२० साठी नोंदणी केलेल्‍या उमेदवारांनी पुन्‍हा इंडियास्किल्‍स २०२१ साठी नोंदणी करू नये, ते सहभागासाठी पात्र ठरले आहेत.
  • इंडियास्किल्‍स २०२० साठी पूर्वी नोंदणी केलेले आणि राज्‍य स्‍तरीय स्‍पर्धेपूर्वी किंवा स्‍पर्धेच्‍या वेळी वगळण्‍यात आलेले उमेदवार पुन्‍हा इंडियास्किल्‍स २०२१ साठी नोंदणी करण्‍यास पात्र नाहीत.
  • या स्पर्धेसाठी पात्रता निकष असे आहेत की, उमेदवार सर्व कौशल्‍यांसाठी १ जानेवारी १९९९ रोजी किंवा त्‍यानंतर जन्‍मलेला असावा. पण मेकॅट्रॉनिक्‍स, क्‍लाऊड कम्‍प्‍युटिंग, सायबर सिक्‍युरिटी, वॉटर टेक्‍नोलॉजी आणि इन्‍फॉर्मेशन नेटवर्क के‍बलिंगसाठी उमेदवार १ जानेवारी १९९६ रोजी किंवा त्‍यानंतर जन्‍मलेला असावा.
  • काही राज्‍यांमध्‍ये सध्‍या नोंदणी सुरू आहे.