
जगभरातील शास्त्र्ाज्ञांचा समावेश असलेली एक आंतरराष्ट्रीय टीम शुक्र (व्हिनस) ग्रहावर ज्वालामुखीचे प्रवाह, चुंबकीय घटक, रिफ्ट झोन अशा विविध घटकांचा भूवैज्ञानिक अभ्यास करत आहेत. अमेरिका, कॅनडा, रशिया अशा देशांचा या इंटरनॅशनल व्हिनस रिसर्च ग्रुप (IVRG) मध्ये समावेश आहे. आता या टीमसोबत काम करण्याची संधी हिंदुस्थानला मिळाली आहे. शुक्राच्या पृष्ठभागाच्या या अभ्यासात हिंदुस्थानचे नेतृत्व बनारस हिंदू विद्यापीठ करणार आहे. या संशोधनात सहभागी होणारी ही हिंदुस्थानची एकमेव टीम आहे. काही फरक सोडल्यास शुक्राचा आकार आणि अंतर्गत रचना ही पृथ्वीसारखी आहे. सूर्यमालेमध्ये शुक्र हा सूर्यापासून बुधानंतर, आणि पृथ्वीअगोदर येणारा क्रमाने दुसरा ग्रह आहे. जरी सर्व ग्रहांच्या भ्रमणकक्षा लंबगोलाकार असल्या तरी शुक्राची भ्रमणकक्षा जवळजवळ वर्तुळाकार आहे. येथे वातावरणात 96 टक्के कार्बन डाय ऑक्साइड आहे, जो पृथ्वीच्या वातावरणापेक्षा 90 पट जास्ती घनतेचा आहे आणि पृष्ठभागाचे तापमान 450ओ. से. आहे, त्यामुळे शुक्रावर पाण्याची एकक नाही. त्यामुळे येथे धूप होत नाही. शुक्र आणि पृथ्वी यांच्या सरासरी घनता अगदी सारख्या असल्यामुळे पृथ्वीवरील खडक ज्या पद्धतीने तयार झाले तसेच शुक्रावरील खडक तयार झाले असावेत. या शोधादरम्यान ज्वालामुखीच्या हालचालींमुळे शुक्र ग्रहाच्या वातावरणात काही बदल घडतो का? आणि घडत असेल तर त्याचे काय परिणाम होतात याचादेखील प्रामुख्याने अभ्यास केला जाणार आहे. शुक्राच्या सखोल अभ्यासासाठी हिंदुस्थानने शुक्रयान-1 आणि रशियाने व्हेनेरा-डी अशा मोहिमांची आखणी केलेली आहे. या मोहिमांच्या यशासाठी इंटरनॅशनल व्हिनस रिसर्च ग्रुपने केलेल्या संशोधनाच्या आणि अभ्यासाचा बहुमोल उपयोग होणार आहे. बनारस हिंदू विद्यापीठाच्या वैज्ञानिक संघाचे समन्वयन प्राध्यापक राजेश कुमार श्रीवास्तव करत आहेत आणि वैज्ञानिक मार्गदर्शन डॉ. रिचर्ड र्अन्स्ट आणि डॉ. एल. बिलाली करत आहेत. डॉ. अमिया कुमार सामल (सहाय्यक प्राध्यापक) आणि दोन पीएच.डी. हर्षिता सिंग आणि ट्विंकल चढ्ढा या मुलींचाही यात सहभाग आहे.
– स्पायडरमॅन
























































