India vs Australia ‘हा’ विजय तर ऍशेसहून मोठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

-ऑस्ट्रेलिया दरम्यानची बहुचर्चित कसोटी क्रिकेट मालिकेला 9 जानेवारीपासून नागपूरमध्ये प्रारंभ होणार आहे. मात्र, हिंदुस्थानचा दौरा किती खडतर असतो हे स्वतः ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी सांगितले आहे. ‘हिंदुस्थानला मायदेशात हरविणे ही इंग्लंडमध्ये ऍशेस मालिका जिंकण्याहून मोठी गोष्ट आहे,’ अशी कबुली ऑस्ट्रेलियन फलंदाजीचा आधारस्तंभ असलेल्या स्टीव्हन स्मिथने दिली आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी एका व्हिडीओद्वारे हिंदुस्थान दौरा किती खडतर असतो याबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर म्हणाला, ‘हिंदुस्थानकडे जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहेत. त्यामुळे या फिरकी गोलंदाजांचा सामना करणे हे नेहमीच आव्हानात्मक राहिलेले आहे.’ वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क म्हणाला, हिंदुस्थान दौरा नेहमीच आव्हानात्मक असतो. येथील वातावरण ऑस्ट्रेलियातील वातावरण भिन्न असते. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघासाठी हिंदुस्थानचा दौरा नेहमीच खडतर असतो, असा आमचा अनुभव आहे.