#IndvsAus T20 WWC ऑस्ट्रेलिया जगज्जेता! टीम इंडियावर 85 धावांनी विजय

1001

टी-20 महिला क्रिकेट विश्वचषक सामन्याच्या अंतिम फेरीत हिंदुस्थानवर 85 धावांनी विजय मिळवत यजमान ऑस्ट्रेलिया संघ जगज्जेता ठरला आहे. वाचा या सामन्याचे अपडेट्स-

 • हिंदुस्थानचा डाव 99 धावांवर आटोपला असून यजमान ऑस्ट्रेलिया संघ टी-20 महिला विश्वचषक स्पर्धेचा विजेता झाला आहे.
 • 97 धावांवर 9 बाद
 • नववा खेळाडू राधा यादव झेलबाद
 • हिंदुस्थानवर पराभवाची छाया
 • हिंदुस्थानचा डाव गडगडला, रिचा घोष बाद
 • शिखा पांडे ही मूनीकडे झेल देऊन बाद झाली आहे.
 • टीम इंडियाचा सातवा गडी बाद झाला आहे.
 • हिंदुस्थानची अवस्था बिकट
 • हिंदुस्थानची सहावी विकेट पडली असून दीप्ती शर्मा झेलबाद झाली आहे.
 • हिंदुस्थान 5 बाद 69
 • डेलेसा किमन्सच्या गोलंदाजीवर जोनासनकडे झेल देत वेदा बाद
 • हिंदुस्थानला पाचवा धक्का, वेदा कृष्णमूर्ती बाद
 • हिंदुस्थानचं अर्धशतक पूर्ण
 • सात षटकांनंतर हिंदुस्थानचा धावफलक 34 धावांवर चार विकेट
 • हिंदुस्थानची कर्णधार हरमनप्रीत कौर ही जोनेसनच्या चेंडूवर गार्डनरकडे झेल देऊन बाद झाली आहे.
 • हिंदुस्थानची स्टार फलंदाज स्मृती मानधना झेलबाद झाली आहे.
 • हिंदुसथानला तिसरा धक्का बसला आहे.
 • हिंदुस्थानला दुसरा झटका, जेमिमा रॉड्रिग्ज झेलबाद
 • हिंदुस्थान 4 धावांवर 1 बाद
 • हिंदुस्थानला पहिला झटका, शेफाली वर्मा बाद
 • ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपला, हिंदुस्थानसमोर 185 धावांचं आव्हान
 • ऑस्ट्रेलिया 19 षटकांमध्ये 4 बाद 176 धावांवर
 • पाचव्या विकेटसाठी निकोला कॅरे आणि बेथ मूनीची फलंदाजी
 • ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला असून रशेल हेनस ही पूनम यादवच्या गोलंदाजीवर यष्टीचीत झाली आहे.
 • चौथ्या विकेटसाठी बेथ मूनी आणि रशेल हेनस यांची भागीदारी
 • ऑस्ट्रेलिया 164 धावांवर तीन बाद
 • दीप्ती शर्माने ऑस्ट्रेलियाची फलंदाज अॅशले गार्डनरला यष्टिचीत केले आहे.
 • ऑस्ट्रेलियाचा धावफलक- 16 षटकांनंतर 154 धावांवर दोन विकेट
 • दीप्ती शर्माने टाकलेल्या चेंडुवर शिखा पांडेकडे झेल देत मेग लॅनिंग बाद
 • 13 षटकांनंतर ऑस्ट्रेलिया 1 बाद 123 धावांवर
 • राधा यादवच्या गोलंदाजीवर कृष्णमूर्तीकडे झेल देत हेली बाद
 • ऑस्ट्रेलियाला पहिला झटका, एलेसा हेली बाद
 • ऑस्ट्रेलियन फलंदाज सुस्साट, बिनबाद 114 धावा
 • आठ षटकांनंतर बिनबाद 76 धावांवर ऑस्ट्रेलिया
 • दीप्ती शर्मा ही गोलंदाजी करत आहे. धावफलक- चार चेंडुंनंतर नाबाद 10 धावा
 • सामन्याला सुरुवात झाली असून एलेसा हेली आणि बेथ मूनी या दोघी सलामीचे फलंदाज म्हणून उतरल्या आहेत.
 • रविवारी 8 मार्च रोजी हिंदुस्थानची कर्णधार हरमनप्रीत कौर हिचा वाढदिवस आहे.
 • मेलबर्न येथे होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
 • त्यामुळे हा संघ जेतेपदापासून आता केवळ एकच पाऊल दूर आहे.
 • हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील ‘टीम इंडिया’ यंदा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
 • ऑस्ट्रेलियन संघाने सर्वाधिक चार वेळा या स्पर्धेचे जगज्जेतेपद पटकावले असून इंग्लंड व वेस्ट इंडीज या संघांनी प्रत्येकी एकदा हा किताब जिंकलेला आहे.
 • हिंदुस्थानी संघाने 2009, 2010 व 2018 मध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.
 • हिंदुस्थानी महिलांनी आतापर्यंत सहा टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेतला आहे, मात्र यंदा प्रथमच या संघाने फायनल गाठण्यात यश मिळवले आहे.
 • या सामन्यात हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
 • टी-20 महिला क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना 8 मार्च रोजी खेळवला जात आहे.
आपली प्रतिक्रिया द्या