IndvsEng – रोहितचे दमदार शतक, टीम इंडिया 6 बाद 300 धावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकर रोहित शर्माने चेन्नई येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱया कसोटीच्या पहिल्या दिवशी 161 धावांची जबरदस्त खेळी करीत नव्या विक्रमांवर मोहोर उमटवली. इंग्लंड, वेस्ट इंडीज, द. आफ्रिका व श्रीलंका या चार देशांविरुद्ध टी-20, वन डे व कसोटी या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. टीम इंडियाने रोहित शर्मा (161) व अजिंक्य रहाणे (67) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर या कसोटीच्या पहिल्या दिवशी 6 बाद 300 धावा फटकावल्या.

n रोहितने मायदेशात सातवे शतक झळकावले. मायदेशात 16 कसोटींमध्ये 83.55च्या सरासरीने त्याने 1504 धावा केल्या आहेत. किमान 1500 धावांचा विचार करताना मायदेशातील सर्वाधिक फलंदाजी सरासरीमध्ये सर डॉन ब्रॅडमन (98.22) यांच्यानंतर त्याचा क्रमांक लागतो.