हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला T20 सामना पावसामुळे रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. वेलिंग्टन येथे होणाऱ्या या सामन्यात पावसामुळे एकही चेंडू टाकला गेला नाही. या सामन्यासाठी हिंदुस्थानी वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता नाणेफेक होणार होती, मात्र पावसामुळे नाणेफेक झाली नाही. दरम्यान, पावसाने थोडावेळ विश्रांती घेतली होती, परंतु सर्व काही ठीक असल्याचे दिसत असतानाच, पावसाचा जोर पुन्हा वाढला आणि त्यानंतरही तो सुरूच होता, त्यामुळे पंचांनी सुमारे दोन तासांनंतर सामना रद्द झाल्याचे घोषित केले.