
राष्ट्रकूल खेळांमध्ये तब्बल 24 वर्षानंतर क्रिकेटला सामील करण्यात आले आहे. याआधी 1998 मध्ये राष्ट्रकूलमध्ये क्रिकेट खेळवले गेले होते. यावर्षी होणाऱ्या राष्ट्रकूल स्पर्धेमध्ये फक्त महिला क्रिकेटला संधी देण्यात आली आहे.
येत्या 28 जुलैपासून ते 8 ऑगस्टपर्यंत इंग्लंडच्या बर्मिंगहम शहरात राष्ट्रकूल स्पर्धा होणार आहे. क्रिकेटचा पहिला सामना 29 जुलैला एजबेस्टन स्टेडिययमवर होणार आहे. क्रिकेटच्या सामन्यांसाठी आठ संघांना दोन गटात विभागले असून ग्रुप ए मध्ये हिंदुस्थान व पाकिस्तानसह ऑस्ट्रेलया व बार्बाडोस हे संघ आहेत. तर ग्रुप बी मध्ये इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व श्रीलंका हे संघ आहेत.
हिंदुस्थानचा पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबतही या स्पर्धेत सामना होणार आहे. हा सामना 31 जुलैला होणार आहे. या स्पर्धेत महिला संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे. तर स्मृती मंधाना ही उपकर्णधार असणार आहे.
टीम इंडिया: हरमनप्रीत कौर (कप्तान), स्मृति मंधाना (उप-कप्तान), शेफाली वर्मा, एस. मेघना, तानिया भाटिया (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), दीप्ति शर्मा, राजेश्वरी गायकवाड़, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणुका सिंह , जेमिमाह रोड्रिग्स, राधा यादव, हरलीन देओल, स्नेह राणा


























































