गेल्या एक वर्षात हिंदुस्थानी बँकांना 41 हजार कोटींचा चुना : आरबीआय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

गेल्या चार वर्षांच्या तुलनेत 2018 या वर्षात बँकाना 41 हजार कोटींचा चुना लागला आहे. आरबीआयच्या एका अहवालानुसार 2017 च्या तुलनेत ही रक्कम 72 टक्क्यांहून अधिक आहे. 2017 साली बँकांना 23 हजार 933 कोटींचा चुना लागला होता.

2018 च्या फेब्रुवारी महिन्यात पंजाब नॅशनल बँकेत मोठा घोटाळा झाला होता. हीरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचे मामा मेहुल चोक्सी यांनी पीएनबीचे 13 हजार कोटी रुपये चोरून फरार झाले. गेल्या चार वर्षात बँकेला धोका देण्याचे प्रकार वाधले आहे. 2013-14 या वर्षात 10 हजार 170 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता तर 2018 मध्ये 41 हजार 147 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता.

एनपीएशी संबंधित एका प्रश्नावर उत्तर देतना अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ला म्हणाले की 2014-15 या आर्थिक वर्षात वसू केलेल्या कर्जातील 2.33  लाख कोटी रुपये वसूल करण्यात यश आले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी सप्टेंबरपर्यंत कर्ज न चुकवणार्‍यांवर 2571 गुन्हे दाखल केले आहेत. तर कर्ज वसूलीसाठी 9363 गुन्हे दाखल करण्यात आले आहे.