#ICCWorldCup वर्ल्डकपमधील हिंदुस्थानचा ‘हा’ विक्रम 35 वर्षानंतरही अबाधित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

आयसीसी क्रिकेट विश्वचषकामध्ये आतापर्यंत अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. परंतु हिंदुस्थानच्या नावावर एक अनोखा विक्रम असून जो येत्या काळात लवकर मोडण्याची शक्यता कमी आहे. 60 षटकांच्या आणि 50 षटकांच्या वर्ल्डकपमध्ये विजेतेपद पटकावणारा हिंदुस्थान एकमेव देश आहे. हिंदुस्थानचा हा विक्रम पाच वेळा विश्वकप जिंकलेला ऑस्ट्रेलिया संघही कधीही मोडू शकत नाही. फक्त वेस्ट इंडीजला ती संधी आहे.

Photo : 1975 ते 2015, आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचे विजेते

हिंदुस्थानने सर्वात प्रथम 1983 ला आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपवर विजेतेपदाची मोहोर उमटवली होती. त्यावेळी 60 षटकांच्या सामन्यात हिंदुस्थानने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली बलाढ्य वेस्ट इंडीजचा पराभव करत ट्रॉफी उंचावली होती. यानंतर क्रिकेटचा प्रकार बदलला आणि वर्ल्डकप 60 ऐवजी 50 षटकांचा झाला.

अब की बार 300 पार होऊनही विजय निश्चित नाही? वाचा काय आहे आकडेमोड

हिंदुस्थानला दुसरा विश्वकप जिंकण्यासाठी तब्बल 28 वर्षे लागली. 2011 ला महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना हिंदुस्थानने श्रीलंकेचा पराभव करत विश्वविजेतेपद पटकावले. धोनीने अखेरच्या षटकामध्ये मारलेल्या षटकारानंतर विजयावर शिक्कामोर्तब झाला आणि हिंदुस्थानने चषक उंचावला. धोनीचा तो षटकार आजही सर्वांच्या स्मरणात आहे.