हिंदुस्थानी उच्चायुक्तांच्या इफ्तार पार्टीत पाकड्यांनी पाहुण्यांना धमकाकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
indian embassy in pakistan

सामना ऑनलाईन । लाहोर

पाकिस्तानमधील इस्लामाबादेत शनिवारी हिंदुस्थानी उच्चायुक्तांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत येणाऱया पाहुण्यांना पाकिस्तानी अधिकाऱयांनी प्रवेशद्वारातच अडवून धमकाकल्याची घटना घडली आहे.

हिंदुस्थानी उच्चायुक्तांनी शनिवारी येथील हॉटेल सेरेनामध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या इफ्तार पार्टीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी, परराष्ठऩ सचिव सोहेल महमूद, सिनेट चेअरमॅनसह अनेक नामांकित लोकांना आमंत्रण देण्यात आले होते. पार्टीत मोठय़ा प्रमाणात पाहुणे मंडळी येऊ लागली तेव्हा पाकिस्तानी अधिकाऱयांनी पाहुण्यांना प्रवेशद्वारावरच अडवले. तर काही जणांनी पाहुण्यांना फोन करून पार्टीत सहभागी न होण्याबद्दल आणि झाल्यास गंभीर परिमाणांना सामोरे जावे लागेल अशा धमक्याही दिल्या.

याविषयी हिंदुस्थानी उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी ट्विटरवर झालेल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करत पाहुण्यांची माफी मागितली असून प्रतिक्रिया दिली की, हे कृत्य खूपच निराशाजनक असून पाकिस्तानने फक्त राजकारणाच्या आचरणाचा अनादर केला नसून दोन्ही देशांतील सुधारणा होणाऱ्या द्विपक्षीय संबंधांनाही खराब केले आहे.