कॅनडामध्ये हिंदुस्थानी विद्यार्थिनीची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅनडामध्ये शिक्षणासाठी गेलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थिनीची दिवसाढवळ्या चापूने भोसपून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. विधी कल्पेशभाई मेघानी (22) असे मृत तरुणीचे नाव असून ती गुजरातच्या आणंदमधील बोरसदची रहिवासी होती. शिक्षणासोबत ती नोकरीही करत होती. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला आहे.