रशियात हिंदुस्थानी फुटबॉल शौकिनांचा अपघाती मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,मॉस्को

रशियातील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मॉस्कोला गेलेल्या एका हिंदुस्थानी फुटबॉलशौकिनांचा शनिवारी पहाटे कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा फुटबॉलशौकीन एल्डर आणि कासांन्या दरम्यान टॅक्सीने प्रवास करीत होता. या अपघातात टॅक्सीचालकासह हिंदुस्थानी नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. कॅबचालक चुकीच्या मार्गाने टॅक्सी चालवत होता. समोरून येणाऱ्या बसने टॅक्सीला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. सोची पोलीस मृत हिंदुस्थानींकडे विश्वचषक लढतीचे तिकीट होते का याचा शोध घेत आहेत.