धक्कादायक! इंडियन नॅशनल लोकदल (INLD) चे हरियाणा प्रमुख नफे सिंग राठी यांची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरियाणामध्ये धक्कादयाक घटना घडली आहे. इंडियन नॅशनल लोक दल (INLD) हरियाणा युटिनचे अध्यक्ष नफे सिंग राठी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असून या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झज्जर जिल्ह्यातील बहादूरगड शहरात हल्लेखोर दबा धरून बसले होते. नफे सिंग राठी यांची गाडी येताच त्यांनी त्यांच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या राठी यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णायलात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, या गोळीबारात राठी यांच्या सोबत असलेल्या आणखी एका कार्यकर्त्याचाही मृत्यू झाला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.