देशात चौथी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते गुरुवारी होणार उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vande-bharat-express

देशात चौथी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. नवी वंदे भारत ट्रेन दिल्ली, चंदीगढ मार्गे हिमाचल प्रदेशातील उनापर्यंत जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते शुक्रवारी या एक्सप्रेसचे उद्घाटन होणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका होत असल्याने या राज्याला वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाल्याची चर्चा आहे.

ही वंदे भारत ट्रेन बुधवार वगळता आठवड्यातील सहा दिवस धावणार आहे. नवी दिल्लीहून हिमाचल प्रदेशपर्यंत अंबाला, चंदीगढ, आनंदपूर साहिब आणि उना स्थानकांवर थांबेल. देशातील ही चौथी वंदे भारत एक्सप्रेस आहे. पहिली वंदे भारत एक्सप्रेस नवी दिल्ली ते वारणसी या मार्गावर सुरू झाली होती. तर दुसरी वंदे भारत एक्सप्रेस नवी दिल्ली ते कटरा अशी होती. त्यानंतर अहमदाबाद ते मुंबई ही तिसरी एक्स्प्रेस आहे. आता ही चौथी एक्सप्रेस सुरू होत आहे.

वंदे भारत ट्रेन अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज आहे. त्यात जीपीएस आधारीत सूचना प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, व्ह२क्युम आधारीत बायो टॉयलेट, ऑटोमॅटिक स्लाइडिंग दरवाजांसह अनेक सुविधा आहेत. त्यात आणखी सुधारणा करत नेक्स जनरेशन वंदे भारत 2.0 ट्रेनमध्ये कवच सुविधा (ट्रेन कोलिजन अवॉइडेंस सिस्टम) असल्याने प्रवास सुरक्षित होणार आहे.