हिंदुस्थानी महिला कुस्ती संघाचे कोच ऍण्ड्रय़ू कूकअमेरिकेला रवाना

359

कोरोना व्हायरसमुळे लखनौ, सोनिपत येथील शिबीर रद्द केल्यामुळे हिंदुस्थानच्या महिला कुस्ती संघाचे परदेशी प्रशिक्षक ऍण्ड्रय़ू कूक यांनी अमेरिकेकडे धाव घेतली आहे.

लखनौ येथील साई सेंटरमध्ये खेळाडूंचे शिबीर सुरू होते. पण होळीनिमित्त सुट्टीवर गेलेले खेळाडू अद्याप या सेंटरमध्ये आलेले नाहीत. कोरोना व्हायरसमुळे त्यांनी घरीच राहणे पसंत केले आहे. त्यामुळे साई सेंटरमध्ये चार ते पाच खेळाडू आहेत. तसेच हिंदुस्थानी प्रशिक्षक कुलदीप मलिक यांनीही आजारी असल्यामुळे हरयाणा या आपल्या राहत्या घरी प्रयाण केले आहे. त्यामुळे ऍण्ड्रय़ू कूक हेही अमेरिकेत गेले आहेत.

ऑलिम्पिक पात्रता फेरीही लांबणीवर

बॅडमिंटन या खेळाच्या ऑलिम्पिक पात्रता फेरीही लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनकडून एप्रिल महिन्यात होणाऱया पाच स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या पाचही स्पर्धा ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी महत्त्वाच्या होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या