ज्युनियर आशिया चषकासाठी हिंदुस्थानी महिला हॉकी संघ जाहीर

येत्या 2 जूनपासून जपानच्या काकामीगहरा येथे सुरू होणाऱया महिला ज्युनियर आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी 18 सदस्यीय हिंदुस्थानी संघाची निवड करण्यात आली असून प्रीतीकडे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. हिंदुस्थानच्या ‘अ’ गटात कोरिया, मलेशिया, चिनी तैपेई आणि उझबेकिस्तानचा समावेश आहे तर ‘ब’ गटात यजमान जपान, कझाकस्तान, हाँगकाँग, चीन आणि इंडोनेशिया हे संघ खेळतील. ही स्पर्धा हिंदुस्थानसाठी खूप महत्त्वाची असून स्पर्धेतील अव्वल तीन संघ या वर्षी होणाऱया ज्युनियर महिला हॉकी स्पर्धेसाठी पात्र ठरतील.  हिंदुस्थानी ज्युनियर महिला संघ ः गोलरक्षक माधुरी किंडो, अदिती महेश्वरी;  बचावफळी ः महिमा टेटे, प्रीती (कर्णधार), नीलम, रोपनी कुमारी, अंजली बरवा ; मध्यरक्षक ः ऋतुजा पिसाळ, मंजू चौरसिया, ज्योती छत्री, वैष्णवी फाळके, सुजाता कुजूर, मनश्री शेंडगे; आक्रमक ः मुमताज खान, दिपीका (उपकर्णधार), दिपीका सोरेंग, अन्नू, सुनलिता टोप्पो.