सोपा पासवर्ड पडतोय महागात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जी-मेलपासून ते बँक यूपीआय व्यवहार करताना सुरक्षिततेसाठी पासवर्डची आवश्यकता असते. अनेक युजर्स सोपा आणि सहज लक्षात राहण्याजोगा पासवर्ड तयार करतात, मात्र असेच पासवर्ड युजर्सना महागात पडत असल्याचे दिसतेय. पासवर्ड मॅनेजर सोल्युशन फर्म ‘नॉर्डपास’ने नुकतीच 200 कमकुवत पासवर्डची यादी जाहीर केली आहे, यापैकी 62 पासवर्ड असे आहेत की, जे अवघ्या काही सेकंदात सहज हॅक होऊ शकतात.

‘नॉर्डपास’ने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात हिंदुस्थानातील बहुतेक युजर्स 123456, आय लव्ह यू, क्रिष्णा, साईराम आणि ओम साईराम अशा सोप्या पासवर्डचा अधिक वापर करत असल्याचे आढळले आहे. 12345678, india123, qwerty, abc123, 123123, abcd1234 हेदेखील कमकुवत पासवर्डच्या यादीत समाविष्ट आहेत. ‘पासवर्ड’ हा शब्दच अनेक जण ‘पासवर्ड’ म्हणून वापरत आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिला आय लव्ह यू, स्वीटहार्ट, लव्हली, रोमॅण्टिक शब्दांचा अधिक वापर करतात असे अहवालात म्हटले आहे.

असा निवडा सुरक्षित पासवर्ड

पासवर्ड विसरण्याच्या शक्यतेमुळे युजर्स सोपा, सहज लक्षात राहण्याजोगा पासवर्ड क्रिएट करतात. असे पासवर्ड युजर्सच्या लक्षात तर राहतात, परंतु असे पासवर्ड सहज हॅक होऊन आर्थिक फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पासवर्ड क्रिएट करताना त्यात पॅपिटल लेटर, नंबर, स्पेशल पॅरेक्टर्सचा समावेश करावा