
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धक परमदीप आणि कोरिओग्राफर अनुराधा यांनी ‘गेरूआ’ गीताकर परफॉर्म करून परीक्षकांना थक्क केले. त्याकर सूत्रसंचालक भारती सिंह म्हणाली की, तिला याच गाण्यावर टेरेन्ससोबत डान्स करायला आवडेल. त्यावर हर्ष लिंबाचिया उत्तरला की, तर मग तो मलाइकासोबत डान्स करेल. हर्षने पहिली स्टेप केली आणि बॉलीवूड सुंदरी मलाइकासोबत डान्स करत तिला आपल्या हातांकर उचलून घेतले. जेव्हा मलाइकाने हर्षला तिच्यासोबत नाचण्याची विनंती केली, तेक्हा हर्षसाठी तो एक स्वप्नवत क्षण होता. हर्ष म्हणाला, ‘या शोमध्ये येण्यामागील माझा मुख्य उद्देश होता, या बॉलीवूड सुंदरीबरोबर डान्स करणे आणि आता तो उद्देश साध्य झालेला आहे. त्यामुळे मी हा शो सोडून जाऊ शकतो. भारती एकटी हा शो सांभाळेल.’ हा ‘इंडियाज बेस्ट डान्सर’चा एपिसोड दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर बघता येईल.




























































