दिघीच्या भूमिपुत्र कामगारांवर अदानींचा अन्याय; भूमिपुत्रांचा आंदोलनाचा इशारा

श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्ट चालवण्यास अदानी समूहाने घेतल्यापासून दिघी पोर्टच्या स्थानिक कामगारांवर अन्याय सुरू आहे. तुटपुंजा पगार आणि अन्य लाभ देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने भूमिपुत्रांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आज गेट मिटिंग घेऊन कंपनीला 14 दिवसांची नोटीस देण्याचा निर्णय घेण्यात आला. अदानी मॅनेजमेंटने स्थानिक कामगारांच्या बाबतीत दुजाभाव सुरू केला आहे. अदानी दिघी पोर्टच्या मॅनेजमेंटने केलेल्या अन्यायाविरुद्ध स्थानिक कामगार तीव्र संताप व्यक्त करत आहेत. दिघी पोर्टचे कामगार नावाला असून अदानी कंपनी आपल्या कामगारांना सर्व लाभ देत आहे. पगार, पीएफ, रजा, ओव्हर टाईम, सुट्ट्यांचा लाभ या सर्वच बाबतीत स्थानिक कामगारांवर अन्याय केला जात आहे. याविषयी निकाल होण्यासंदर्भात सध्या पोर्टचे सीईओ कपिलकुमार खंडेलवाल आणि एचआर कदम यांच्यासोबत कामगार प्रतिनिधींची बैठक घेतली. मात्र मॅनेजमेंटने केवळ कामगारांच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे दिघी पोर्टच्या मेन गेटला युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी गेट मिटिंग घेऊन 14 दिवसांची अधिकृत नोटीस देऊन बेमुदत संप करण्याचा इशारा दिला