मुंबई पोलीस अजिंक्य

मुंबई पोलीस संघाने इन्श्युरन्स शील्ड कार्यालयीन टी-20 क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपदावर मोहोर उमटवली. क्रॉस मैदानावर झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत बीईएसटी या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मुंबई पोलीस ‘ब’ संघाने प्रथम फलंदाजी करताना 193 धावा उभारल्या. क्रुतुराज मुणगेकर याने 117 धावांची खेळी साकारली. धावांचा पाठलाग करताना बीईएसटी संघाचा डाव 127 धावांमध्येच कोसळला. अखेर त्यांचा 66 धावांनी पराभव झाला.

ओरिएंटल इन्श्युरन्सचे अनिल श्रीवास्तव व चेतन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. याप्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) संजय नाईक, शाह आलम, उन्मेष खानविलकर, नदीम मेमन, अभय हडप, अमित दाणी, काwशिक गोडबोले हेही उपस्थित होते. दरम्यान, कार्यालयीन क्रिकेट संस्थांना मदत केली जाईल असे आश्वासन एमसीए पदाधिकाऱयांकडून यावेळी देण्यात आले. मुंबईतील ऑफिस क्रिकेट जगवण्यासाठी गेली अनेक वर्षे मेहनत करणारे ओरिएंटल इन्श्युरन्स क्लबचे सहसचिव जितेंद्र इंगळे यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा यशस्वी पार पडली.

स्पर्धेचे पारितोषिकवीर

मालिकावीर                    – क्रुतुराज मुणगेकर

सर्वोत्तम फलंदाज             – तन्मय मयेकर

सर्वोत्तम गोलंदाज            – योगेश जगताप

सर्वोत्तम क्षेत्ररक्षक            – ज्ञानेश्वर गजरे

आपली प्रतिक्रिया द्या