
दहावीच्या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय रेखाकला परीक्षा (इंटरमिजिएट) 22 व 23 फेब्रुवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. एलिमेंटरी परीक्षाही लवकरच घेण्यात येणार असून त्याविषयीच्या सूचना कला संचालनालयाच्या वेबसाईटवर स्वतंत्रपणे जाहीर केल्या जाणार आहेत. दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना कला क्षेत्रातील विशेष प्रावीण्यासाठी अतिरिक्त गुण देण्यात येतात. चित्रकलेतील अतिरिक्त गुणांसाठी विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असते. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये दहावीच्या परीक्षेला बसणाऱया विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट परीक्षा देता येणार आहे. तसेच आगामी काळात एलिमेंटरी परीक्षेबाबतही स्वतंत्रपणे परिपत्रक जाहीर केले जाईल, अशी माहिती कला संचालक राजीव मिश्रा यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.
























































