आसाममध्ये 16 डिसेंबरपर्यंत इंटरनेट सेवा, शाळा, महाविद्यालये बंद राहणार

418

नागरिकता सुधारणा कायद्याला ईशान्य हिंदुस्थानात तीव्र विरोध होत आहे. सोशल मिडीयाचा गैरवापार टाळण्यासाठी आणि सुरक्षेच्या कारणास्तव आसाममध्ये 16 डिसेंबरपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच शाळा, महाविद्यालयेही बंद राहणार आहेत. आता आसाममधील परिस्थिती नियंत्रणाता असल्याचे पोलीस महासंचालक बी.जेय महंत यांनी सांगितले.

आसाम, मेघालय, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि दिल्लासह देशातील अनेक भागात नागरिकता सुधारणा कायद्याला विरोध होत आहे. ईशान्य हिंदुस्थानात या कायद्याविरोधात आंदोलन आणि निदर्शने करण्यात येत आहेत. आसाममध्ये कायदासुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सोशल मिडीयाचा गैरवापर होऊ नये, म्हणून 48 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येत असल्याचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कृष्ण यांनी सांगितले. सोशल मिडीयाचा वापर अफवा आणि चुकीची माहिती पसरवण्यासाठी, तसेच भडकाऊ पोस्ट, फोटो, व्हिडीओ पसरवण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालयेही सोमवरापर्यंत बंद राहणार आहेत. गुवाहाटीत काही भागात संचारबंदी उठवण्यात आली आहे. आसाममध्ये सुरक्षेसाठी काही भागात संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. राजधानी दिल्लीतही शुक्रवारी जामिया विद्यापीठाबाहेर निदर्शने करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या