भंडारा व गोंदिया जिल्ह्यांतील युवासेना युवतींच्या पदांकरिता मुलाखती

24

सामना प्रतिनिधी । मुंबई

भंडारा व गोंदिया जिह्यातील युवासेना युवतींच्या पदांकरिता नेमणुका करण्यात येणार असून त्यासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. युवासेनेचे पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱयांनी युवासेनेचे सक्रिय सदस्य असणे अवश्यक आहे. गोंदिया जिह्यातील पदांसाठी रविवार, 21 जुलै रोजी दुपारी 12 वाजता अग्रसेन हॉल, गोंदिया पोलीस ठाण्याजवळ, गोंदिया शहर येथे मुलाखती होणार आहेत, तर भंडारा जिह्यातील पदांसाठी सोमवार 22 जुलै रोजी दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह, भंडारा शहर येथे मुलाखती होणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीपूर्वी एक तास आधी उपस्थित राहावे. तसेच मुलाखतीला येताना सोबत आपले छायाचित्र आणावे. इच्छुक कार्यकर्त्यांसाठी माहिती अर्ज सदर मुलाखतीच्या ठिकाणी ठेवण्यात येतील असे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या