
प्रतिकूल स्थितीत अनुभवलेल्या माणुसकीचे दर्शन घडवतोय अभिनेता आनंद इंगळे…
दोन वर्षांपूर्वी जेव्हा कोरोनामुळे लॉकडाऊन झाला, तेव्हा अचानक सर्वकाही थांबले. लॉकडाऊनच्या काळात माझ्या एका मित्राने फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. ‘कुणाला काही मदत करायची असेल किंवा कुणाला काही मदत हवी असेल तर आपण करू,’ अशा आशयाची ती पोस्ट होती. मी लॉकडाऊनच्या काळात मी पुण्यातच होतो. पुण्यात असे अनेक आजी-आजोबा आहेत की, ज्यांची मुले परदेशात राहतात. अशा आजी-आजोबांचे आधी सर्वकाही सुरळीत सुरू होते, कारण घरात घरकाम करायला मदतनीस यायचे. पण लॉकडाऊनमध्ये त्यांच्यापुढे मोङ्गी समस्या उभी राहिली.
मला आङ्गवतेय की, पुण्यात असेच एक आजी-आजोबा राहात होते. या आजी अंथरूणाला खिळून होत्या. आजोबा साधारण 78 वर्षांचे होते. आम्ही त्यांचा पत्ता मिळवला आणि त्यांच्याकडे औषधे वगैरे पोहोचवण्याची व्यवस्था केली. वास्तविक, फेसबुकवरच आम्हाला त्यांच्या मुलांकडून या आजी-आजोबांविषयी कळले होते. मनीष साबडे, सचिन देवधर अशा आम्ही काही जणांनी मिळून ही जबाबदारी स्वीकारली होती. अशा प्रसंगात आपल्याला आपलीच ओळख पटत जाते. लोकांसाङ्गी आपण काय करू शकतो हे अशा वेळी प्रकर्षाने जाणवते. अशा वेळी हेही लक्षात येते की, ती केवळ आपली जबाबदारी नाही, तर ते आपले कर्तव्यच आहे.
मी जेव्हा त्या आजी-आजोबांकडे सर्वप्रथम गेलो, तेव्हा मला लक्षात आले की, त्या दोघांना मधुमेह आहे. त्यांना बाहेरून कुङ्गूनही जेवणाच्या डब्याची व्यवस्था होऊ शकत नव्हती. दीड-दोन दिवस ते आजी-आजोबा त्यांच्या घरात जी काही फळे वगैरे शिल्लक होती, त्याच्यावरच गुजराण करत होते. त्यांना त्या वेळी आम्ही योग्य ती मदत केली, पण पुढे अशा काही ज्येष्ठ मंडळींची माहिती काढून त्यांना काय हवे-नको ते बघून, माझ्या घरातूनच मी असे डबे तयार करण्याची व्यवस्था करत होतो. आम्ही आमची जबाबदारी पार पाडल्यावर, अशा आजी-आजोबांच्या आणि त्यांच्या मुलांच्या चेहऱयांवर कृतज्ञतेचा भाव आम्हाला जाणवला.
याच काळातला दुसरा एक प्रसंग मला आङ्गवतो. असेच एक आजी-आजोबा होते आणि त्यांची मुलगी पुण्यातच, पण दुसरीकडे राहायची. या मंडळींची जबाबदारी घेताना आम्ही अक्षरशः ट्रान्सपोर्टेशनचे काम केले. त्यांच्या वस्तू, सामान वगैरे घेऊन त्यांना गाडीत बसवून त्यांना त्यांच्या मुलीपर्यंत आम्ही सुखरूप पोहोचवले. हे सर्व खूपच अवघड होते, परंतु त्याचमुळे हे प्रसंग माझ्या कायम लक्षात राहिले. या प्रसंगांपुढे माझ्या आयुष्यात मी आधी ज्या काही घटना अनुभवल्या आहेत, त्या खूपच फिक्या पडतात.
मी मूळचा पुण्याचा आहे आणि मुंबईला कामानिमित्त माझे येणे-जाणे सुरू असते. आमच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकाचा एकदा वाशीला प्रयोग होता. येताना ‘एक्सप्रेस-वे’वर माझ्या गाडीचा टायर फुटला. गाडी कशीबशी सावरून मी बाजूला उभी केली. चार-साडेचारचा प्रयोग होता आणि ही घटना दोन-सव्वादोनच्या सुमारास घडली. या सगळय़ा प्रकारात मला थोडेफार लागले होते. ‘व्यक्ती आणि वल्ली’मध्ये मला संपूर्ण नाटकभर उभे राहायचे होते. आता मी जिवंत आहे, पण त्याक्षणी काहीही घडू शकले असते, ही जाणीवच धक्का देणारी होती. त्याप्रसंगी मी त्या हायवे सिक्युरिटीचा नंबर डायल करत होतो. अक्षरशः पंधरा मिनिटांत ते लोक घटनास्थळावर पोहोचले. मात्र मला त्या वेळेला एक जाणवले की, माझ्या बाजूने गेलेल्या दोन गाडय़ांमधून कुणीही माझ्या मदतीला तेव्हा आले नाही, पण नंतर मला एक कुटुंब भेटले त्यांनी मला त्यांच्या गाडीत बसवले. त्यांच्या एका मुलाकडे मी माझ्या गाडीची किल्ली दिली. हा कुङ्गला विश्वास होता मला माहीत नाही, पण का कोण जाणे मला त्यांच्यावर विश्वास ङ्खेवावासा वाटला.
माझा तो प्रयोग संपताच मला त्या मुलाचा पह्न आला की, ‘मी थिएटरपासून पाच मिनिटांच्या अंतरावर पोहोचलो आहे. तुमची गाडी व्यवस्थित करून घेतलेली आहे.’ तुमचा चांगुलपणा तुमच्याकडे कुङ्गल्या ना कुङ्गल्या रूपाने परत येतोच, यावरचा माझा विश्वास यातून अधिक दृढ झाला. आपण म्हणतो की, अनोळखी माणसांवर विश्वास ङ्खेवू नका, परंतु मला मात्र चांगला अनुभव आला. खरे तर वाईट आणि धक्का देणारे अनुभवही आयुष्यात येतात, पण ते सोडून देऊन या सकारात्मक गोष्टी मला त्यापेक्षा जास्त महत्त्वाच्या वाटतात. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही स्वतःमध्ये होणारी जाणीव महत्त्वाची असते. तेव्हा कुङ्गे अशा अचानक उद्भवणाऱया प्रसंगांत अनोळखी माणसे आपल्या मदतीला येतात. मला माझ्या आयुष्यात नेहमी चांगलीच माणसे भेटली. अजूनही जग चांगल्या लोकांवर चालले आहे आणि मला अजूनही शंभर टक्के असे वाटते की, जगात चांगल्या माणसांची संख्या नक्कीच जास्त आहे.
– शब्दांकन : राज चिंचणकर



























































