
>> अश्विनी पारकर
महाराष्ट्रातील दलित तरुणांना उद्योग-व्यवसायाच्या प्रवाहात आणण्याचं काम डिक्की ही संस्था करते. डिक्कीच्या महाराष्ट्र महिला विभागाच्या अध्यक्षपदी चित्रा उबाळे यांची नुकतीच निवड झाली. उद्योग-व्यवसायातील अधिकाधिक संधी महिलांना प्राप्त व्हाव्यात यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. एक उद्योजिका ते डिक्कीच्या महाराष्ट्र महिला विभाग अध्यक्षा हा त्यांचा प्रवास मांडणारी ही मुलाखत.
डिक्कीच्या कार्याची सुरुवात कशी झाली?
– डिक्की म्हणजे दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ही संस्था पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी 2005 साली स्थापन केली. त्यावेळी त्यांच्या डोक्यात महत्त्वाच्या गोष्टी होत्या, त्या म्हणजे दलित उद्योजकांना एकत्र आणणं. कारण उद्योजक म्हणून शासनाकडून काही मदत मिळवायची असेल तर त्यासाठी दलित उद्योजकांची एकजूट असणं आवश्यक आहे. त्यानंतर हळूहळू डिक्कीच्या कार्यात माणसं जोडत गेली. आज जवळ जवळ 10 हजारांच्या वर डिक्कीमध्ये सदस्य आहेत. सरकारमध्ये जशी खाती असतात आणि मुख्यमंत्री जसे केंद्रस्थानी असतात तशीच डिक्कीची व्यवस्था आहे. प्रत्येक खाती एकमेकांसोबत असतात आणि त्यांचे कार्य करतात. आम्ही डिक्कीची पॉलिसी जेव्हा तयार करतो तेव्हा आम्ही ती पॉलिसी प्रत्येक राज्य सरकारकडून सॅन्क्शन करून घेतो.
तुम्हाला डिक्कीच्या कार्यात सहभागी व्हावं असं का वाटलं?
– सर्वप्रथम मला असे सांगावेसे वाटते की, मी बँकेतली माझी नोकरी सोडून उद्योगात आले होते. उद्योगात आल्यावर मला त्यावेळी तशा काही समस्या भेडसावत नव्हत्या, परंतु आपल्या हातून लोककार्य व्हावं असं मला नेहमी वाटत राहायचं. त्यावेळी मला जाणवलं की, मी एकटी ही मदत नाही करू शकत. मी जेव्हा माझ्या दुसऱया कार्यालयाचं उद्घाटन केलं तेव्हा मी मिलिंद कांबळे सरांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं, पण मिलिंद कांबळे यांचा एकंदर वावर पाहून मी अवाक् झाले. एवढय़ा मोठय़ा चेंबर ऑफ कॉमर्सचे ते अध्यक्ष आहेत. माझं कार्यालय इतकं काही मोठं नव्हतं, परंतु एक स्त्राr इथे काम करत आहे म्हणून ते आले. त्यांनी मांडलेले विचार त्यांचं एकदंरीतच वावरणं पाहून मी असा विचार केला की, मीही हे करावं. माझीही डिक्कीच्या कार्यात मदत होईल यादृष्टीने मी डिक्कीमध्ये आले.
पण त्यावेळी तुम्ही डिक्कीत इतक्या मोठय़ा पदावर जाल असं वाटलं होतं का?
– त्यावेळी अशी काही जबाबदारी माझ्यावर येईल असं मला वाटलं नव्हतं, पण जेव्हा तुम्ही सच्च्या दिलाने काम करता त्यावेळी तुम्हाला ती पदं मिळत जातात. त्यामुळे आणखी भरपूर कामं करण्याची संधी मला मिळाली असे मला वाटते.
डिक्कीच्या महाराष्ट्र महिला विभागाच्या अध्यक्षा म्हणून काय सांगाल?
– डिक्कीच्या कार्याला वलय आहे आणि हे काम मी उत्तम रीतीने करू शकते याचं श्रेय मी डिक्कीचे महाराष्ट्र अध्यक्ष संतोष कांबळे आणि डिक्कीच्या मार्गदर्शक सीमा कांबळे यांना देऊ इच्छिते. यामध्ये दोन गोष्टी आहेत. यामध्ये स्त्राr म्हणून तुम्हाला विशेष वागणूक दिली जाते असं काही नाही. आमच्याकडे समान रीतीने म्हणजेच उद्योजक म्हणून पाहिले जाते. आमचं कौशल्य काय आहे त्यावर आमचं पद अवलंबून आहे. जो तिथे जाऊन काम करू शकतो त्याला ती जबाबदारी दिली जाते. पुरुषांच्या मीटिंगमध्ये स्त्राr बोलू शकते आणि स्त्रियांच्या मीटिंगमध्ये पुरुष बोलू शकतात. तुम्ही स्त्राr आहात म्हणून तुम्हाला विशेष वागणूक आणि तुम्ही पुरुष असाल म्हणून तुमचेच वर्चस्व याला डिक्कीमध्ये थारा नाही.
दलित उद्योजकांना डिक्कीची मदत कशी होते?
– सरकारतर्फे दलितांसाठी उद्योग धोरणांमध्ये काही आरक्षणं दिली आहेत. ही आरक्षणं दलितांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा खोटय़ा पद्धतीने पोहोचवली जातात. याबाबत डिक्की कार्य करते. उदाहरणार्थ, सरकारच्या ज्या आस्थापना असतात त्यातर्फे अनेक गोष्टी खरेदी केल्या जातात. हा जवळ जवळ सहा लाख करोडचा उद्योग असतो. त्याच्यामध्ये पूर्वी चार टक्के म्हणजे 24 हजार करोडचा धंदा हा शेडय़ूल कास्ट कॅटेगरीला मिळायला हवा, पण तसं होत नाही कारण त्याबद्दलची जागृतीच मुळात दलित उद्योजकांमध्ये नसते. अशा वेळेला सरकारने काय केलं तर आम्हाला कंत्राट मिळण्यासाठी थेट अर्ज करायला सांगितले. यामध्येही काही लाख रुपये ही इसारा रक्कम म्हणून भरावी लागते. डिक्कीतर्फे या कंत्राटांसाठी अर्ज केला जात असल्यामुळे उद्योजकांना ही रक्कमच भरावी लागत नाही. यामध्ये अगदी स्त्रियाही जनरल कॅटेगरीमधून आल्या तरी त्यांना प्राधान्य दिले जाते.
उद्योगांबाबत दलित समाजामध्ये कितपत जागृती आहे ?
– या विषयावर बोलताना मी दलित समाजाचे दोन भाग विशद करेन.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत ज्यांनी काम केलं, त्यांच्या विचाराने जे प्रभावीत झाले, अत्यंत सुशिक्षित झाले. त्यांची ही आता तिसरी पिढी आहे. त्या लोकांनी हे जाणलेलं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्यांनी पदवीपर्यंतचं आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. ते मोठय़ा आस्थापनांमध्ये मोठय़ा पदांवर गेले. त्यांनी त्यांच्या पाल्यांनाही उत्तम पद्धतीने मोठं केलं. हा समाजाचा एक विभाग. या विभागाने आपलं अस्तित्व नीट सांभाळलं. त्यांच्या पहिल्या पिढीने जो संघर्ष केला त्याची फळं तिसरी पिढी खाते आहे. ते समाजसेवेसाठीही धपडपडत आहेत. दुसरा विभाग आहे ज्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. त्या विभागातही पुन्हा दोन वर्ग आहेत. त्यापैकी एका वर्गाला शिकायचंच नाही, ज्यांचं प्रमाण 60 टक्के आहे आणि दुसरा वर्ग आहे, जो बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित आहे आणि त्याला आयुष्यात मोठं काहीतरी करायचंय. तो 40 टक्के आहे.
ही जागृती करण्यासाठी तुम्ही काय करता?
– हे मी उदाहरण देऊन स्पष्ट करेन. आपल्यापैकी प्रत्येकाला शेतकऱयाला मदत करावीशी वाटते. ती मदत करता यावी म्हणून मी सोसायटय़ांमध्ये भाजी विकायला लागले. शेतकऱयांनी आणलेला माल आम्ही मोठमोठय़ा इमारतींमध्ये विकायला लागलो त्यांच्याच आवारात. तिथे रोज ऑफिसला जाणाऱया बायका आमची भाजी घेऊ लागल्या. त्यांच्याच आवारात भाजी विकत असलो तरी आमचा माल खणखणीत असल्याने आम्हाला त्यांच्याकडून सहकार्यच मिळाले. पंधरा दिवसांनंतर आम्ही भाजी विकणे बंद केले आणि आश्चर्य म्हणजे त्या इमारतीतून सतत मागणी येऊ लागली. अशा पद्धतीने शेतकऱयांनाही मदत झाली व उद्योगही झाला. गुणवत्तेची हमी, कष्ट करण्याची तयारी, कल्पकता आणि चिकाटी या गुणांच्या जोरावर कोणत्याही उद्योगात यश मिळवता येते, हेच मला सांगावेसे वाटते.
























































