गुंतवणूक मुलांसाठी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नुकताच बालदिन साजरा झाला. मुलांचे भवितव्य या अनुषंगाने आजचा लेख आहे. आपल्याला प्रत्येकाला इच्छा असते आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यावे आणि जमले तर त्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवावे. शिक्षणासाठी फी तर भरावी लागते. शिक्षणाचा खर्च ज्या पद्धतीने वाढत चालला आहे तर त्याचे जर तुम्ही नियोजन नाही केले तर एकतर आपले स्वप्न साकार होऊ शकत नाही, नाहीतर आपल्याला काही वेगळ्या उद्दिष्टांसाठी ठेवलेले पैसे खर्च करावे लागू शकतात.

साधारण शिक्षणाचा खर्च हा वार्षिक 8 ते 10 टक्के या प्रमाणात वाढत गेला आहे. त्यामुळे याची कल्पना मनात ठेवून त्या पद्धतीने तुम्ही एसआयपी कारण गरजेचे आहे. सध्याच्या काळात आपल्याला इंजिनीअरिंग कॉलेजसाठी साधारण वार्षिक 5 लाख तरी फी आहे आणि मेडिकलसाठी जर पेड सीट मिळाली तर 15 ते 20 लाख वार्षिक खर्च होऊ शकतो. आपण आता शिक्षणाबद्दल बोललो, पण आपली मुलांची जबाबदारी फक्त शिक्षणापुरती नसून त्यांच्या बाकीच्या ‘ऑक्टिव्हिटिज’देखील सांभाळावी लागतात. मध्यम वर्गीय कुटुंबात बघितले तर मुलांच्या लग्नापर्यंतही मदत केली जाते. आपल्याला जर मुलांसाठी चांगली भेट द्यायची असेल तर मुलांच्या लहानपणापासूनच आपण त्यांच्या भवितव्यासाठी नीट गुंतवणूक करावी.

 – आनंद म्हाप्रळकर (लेखक आर्थिक सल्लागार आहेत.)

[email protected]