आयोडीनच्या सौम्य द्रावणाने तोंड, नाक साफ केल्यास कोरोना विषाणूंचा खात्मा; संशोधकांचा दावा

कोरोनाचे जगभरातले थैमान नियंत्रणात आणण्याचे शिकस्तीचे प्रयत्न जगभरातील संशोधक करीत आहेत. या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेच्या कनेक्टिकट स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी एक अफलातून शोध लाकल्याचा दावा केला आहे. आयोडीनच्या सौम्य द्रावणाने तोंड आणि नाव वेळोवेळी धुतल्याने कोरोनाच्या विषाणूंचा केकळ 15 सेकंदांत नाश होतो असा निष्कर्ष या संशोधकांनी काढला आहे. आयोडीनच्या सफाईने कोरोना विषाणूला फुफ्फुसांपर्यंत जाण्यापासून रोखता येऊ शकते असे अमेरिकन शास्त्रज्ञांनी सांगितले. कनेक्टिकट स्कूल ऑफ मेडिसिनने केलेल्या प्रयोगांत संशोधकांनी 0.5 टक्के प्रमाण असलेले सौम्य द्रावण कोरोना विषाणूला संपविण्यासाठी वापरले. या प्रयोगात कोविड-19 विषाणूंचे अस्तित्व आयोडीनच्या वापराने 15 सेकंदांत संपविण्यात यश आल्याचे या संशोधकांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या