iPhone 12, Poco X3 Pro सह इतर स्मार्टफोनवर मिळत आहे मोठी सूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर Big Saving Days sale ची सुरूवात 25 जुलै पासून होणार आहे. या सेल मध्ये अनेक टॉप ब्रॅण्डच्या स्मार्टफोनवर मोठी सूट देण्यात आली आहे. फ्लिपकार्टच्या प्लस मेंबरसाठी एक दिवसाआधीच या सेलची सुरुवात होणार आहे. पुढील आठवड्यपासून हा सेल सुरु होणार असून यामध्ये अ‍ॅपल प्रॉडक्टसह अनेक स्मार्टफोनवर बंपर सूट मिळणार आहे.

या सेलमध्ये Poco X3 Pro स्मार्टफोनवर मोठी सूट देण्यात आली आहे. या फोनची किंमत 23,999 रुपये इतकी असून या सेलमध्ये हा फोन आयसीआयसीआय बँक सवलतीसह 17,249 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपल्बध असेल. या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅमसह 128 जीबी अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. यात 6.67 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच 48-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे.

Apple iPhone 12 सध्या 77,900 रुपयांना विकला जात आहे. या फोनवरतीही फ्लिपकार्ट Big Saving Days sale मध्ये मोठी सूट मिळू शकते. मात्र या फोनवर किती रुपयांची सूट मिळणार आहे. हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. याच दरम्यान iPhone 12 mini वरही मोठी सूट दिली जाणार आहे. यासोबत इतर स्मार्टफोनवरही सूट दिली जाणार आहे.