IPL 2020 – राजस्थानचे ‘रॉयल’ दिवस पुन्हा येतील का? दिग्गज खेळाडूंच्या सहभागावर सवाल

ganesh-puranik>> गणेश पुराणिक | मुंबई

आयपीएलच्या पहिल्याच मोसमात अनोळखी चेहऱ्यांसह ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याने राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला अनपेक्षितपणे विजेतेपद मिळवून दिले. मात्र पहिल्या विजेतेपदानंतर राजस्थानच्या संघाला घरघर लागली. प्रत्येक सीझनमध्ये राजस्थानचा संघ विजयासाठी झुंजताना दिसला. मात्र पदरी काहीच पडले नाही. यंदा संघाची कमान स्टीव्ह स्मिथच्या हाती असून इतर ऑस्ट्रेलिया कर्णधारांप्रमाणे तो काही चमत्कार करून संघाला पुन्हा एकदा विजेतेपद मिळवून देतो का हे पाहणे महत्वाचे आहे.

राजस्थान रॉयल्स संघाची सफर शिखराकडून तळाकडे अशीच राहिली. पहिल्या मोसमातील विजेतेपद सोडले तर राजस्थानला 9 मोसमात फक्त एकदा अंतिम 3 संघात स्थान मिळवता आले. तसेच 2 वर्ष संघावर बंदीची कारवाई देखील झाली. गेल्या वर्षीही स्मिथ कर्णधार असतानाही संघाला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. राजस्थानने आयपीएलमध्ये 147 लढती खेळल्या असून 73 विजय आणि 69 लढतीत पराभव स्वीकारला. तीन लढती बरोबरीत सुटल्या. यात 2 मॅच राजस्थानने जिंकल्या तर एकमध्ये पराभव स्वीकारला.

IPL 2020 – धोनीचे आयपीएलमधील अनोखे विक्रम, सातवा तर मोडणे अशक्य

‘या’ खेळाडूंवर असणार भिस्त
81 लढतीत 2022 धावा करणारा स्मिथ राजस्थानच्या फलंदाजीचा कणा आहे. तसेच यंदा टी-20 स्पेशालिस्ट रॉबिन उथप्पा याला राजस्थानने आपल्या संघात घेतले आहे. त्याच्या नावावर 177 लढतीत 4411 धावांची नोंद आहे. अष्टपैलू बेन स्टोक्स हा देखील या संघात आहे, मात्र तो कधी उपलब्ध होतो हा सवाल आहे. तसेच युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, जोस बटलर, डेव्हिड मिलर यांच्यावर संघाला जास्त धावा उभारून देण्याची जबाबदारी असणार आहे. गोलंदाजीत बेन स्टोक्स, वरुण ऍरोन, जोफ्रा आर्चर, जयदेव उनादकट, अंकित राजपूत, कार्तिक त्यागी अशी धारधार गोलंदाजी आहे, तर मयांक मार्कंडेय, राहुल तेवतिया, श्रेयस गोपाल हे फिरकीपटू आहेत.

IPL 2020 – दिल्ली ‘कॅपिटल्स’साठी तरुणांची फौज ‘गेमचेंजर’ ठरणार, अय्यरचा गेम पुन्हा चालणार

कमकुवत बाजू
स्मिथ आणि स्टोक्स यासह इंग्लंडचे खेळाडू पहिल्या काही लढतीला मुकण्याची शक्यता आहे. तसेच एक चांगला फिरकीपटू राजस्थानकडे नाही. यूएईच्या खेळपट्ट्या फिरकीला साथ देणाऱ्या असल्याने राजस्थानची टीम इथे मागे पडू शकते.

IPL 2020 – किंग्ज इलेव्हन पंजाबला पहिल्या ‘टायटल’चे वेध, ही आहे जमेची बाजू

राजस्थानचा संघ
स्टीव स्मिथ (कर्णधार), संजू सॅमसन, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, जोस बटलर, रियान पराग, शशांक सिंह, श्रेयस गोपाल, महीपाल लोमरूर, वरुण ऍरोन, मनन वोहरा, अंकित राजपूत, मयंक मार्कंडेय, राहुल तेवतिया, रॉबिन उथप्पा, जयदेव उनादकट, यशस्वी जायसवाल, अनुज रावत, आकाश सिंह, कार्तिक त्यागी, डेविड मिलर, ओशने थॉमस, अनिरूद्ध जोशी, एंड्रयू टाई आणि टॉम कुरेन.

IPL 2020 – सनरायझर्स हैद्राबादचा संघ मजबूत, पण ‘हे’ आहे मुख्य आव्हान

आपली प्रतिक्रिया द्या