IPL 2020 – किंग्ज इलेव्हन पंजाबला पहिल्या ‘टायटल’चे वेध, ही आहे जमेची बाजू

5022

ganesh-puranik>> गणेश पुराणिक | मुंबई

आयपीएलच्या प्रत्येक मोसमात चांगला संघ असतानाही किंग्ज इलेव्हन पंजाबला (Kings xi Punjab) विजेतेपदाने हुलकावणी दिली. यंदा पंजाबने मधल्या फळीला मजबूत करण्याचा लिलावात मोठी रक्कम खर्च केली आहे. पंजाबकडे षटकारांचा बादशाह ख्रिस गेलसह कर्णधार के.एल. राहुल ही भक्कम सलामीची जोडी आहे. गोलंदाजीही मजबूत असल्याने पंजाबचा संघ पहिल्या विजेतेपदासाठी मैदानात उतरेल.

पंजाबचा संघ आयपीएलची सुरुवात झोकात करतो, मात्र अखेरच्या टप्प्यात संघाची कामगिरी सुमार होते. गेल्या वर्षीही पहिल्या 7 लढतीत पंजाबच्या संघाने दमदार कामगिरी केली, मात्र अंतिम टप्प्यात कामगिरीत घसरण झाल्याने संघाला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तसेच गेल्या 5 वर्षात पंजाबला टॉप 5 संघातही जागा मिळवता आलेली नाही. 2014 ला पंजाब रनरअप राहिला होता, मात्र त्यांनंतर एकदाही पंजाबला प्ले-ऑफ गाठता आली नाही.

IPL 2020 – विजेतेपदाचा ‘चौकार’ लगावण्यासाठी CSK मैदानात उतरणार, जाणून घ्या ताकद व कमजोरी

ताकद
पंजाबच्या संघात यंदा आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि स्थानिक खेळाडू यांचे चांगले संतुलन आहे. के. एल. राहुल, ख्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल, निकोलसन पूरन, करुण नायर, मयंक अग्रवाल, सरफराज खान, शेल्डन कॉटरेल, क्रिस जॉर्डन, जिम्मी नीशम असे टी-20 स्पेशालिस्ट खेळाडू आहे, तर गोलंदाजीत मुजीब उर रहमान, इशांत पोरेल रवि बिश्नोई, मोहम्मद शमी अशी फळी आहे.

IPL 2020 – कार्तिकच्या हाती कमान, रसेल फोडणार गोलंदाजांना घाम; केकेआर तिसऱ्या विजेतेपदासाठी तयार

कमजोरी
डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करू शकणारा चांगला गोलंदाज पंजाबच्या संघात नाही. आर. अश्विन दिल्लीच्या संघात गेल्याने फिरकीचा भार एकट्या मुजीबच्या खांद्यावर आला आहे. त्याला अंडर-19 खेळाडू रवि विश्नोईची साथ मिळेल, मात्र अनुभवी खेळाडुंसमोर त्याची डाळ किती शिजेल हे वेळ आल्यावर कळेल.

बीडच्या अंबाजोगाई येथील ‘कलाकार’ IPL गाजवण्यासाठी सज्ज, गतविजेत्या मुंबईच्या संघात समावेश

पंजाबचा संघ
के.एल. राहुल (कर्णधार), ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स नीशम, क्रिस जॉर्डन, मोहम्मद शमी, मुजीब जादरान, शेल्डन कॉट्रेल, हार्डस विलजोन, दर्शन नलकंडे, हरप्रीत बरार, अर्शदीप सिंह, मंदीप सिंह, सरफराज खान, के गौतम, जे सुचित, रवि बिश्नोई, दीपक हुड्डा, तजिंदर ढिल्लों, प्रभसिमरन सिंह आणि मुरुगन अश्विन.

IPL 2020 – सर्वाधिक धावा, विकेट्स ते सर्वाधिक षटकार; 10 प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर

आपली प्रतिक्रिया द्या