
>> गणेश पुराणिक | मुंबई
इंडियन प्रीमियर लीगवर (आयपीएल) पुन्हा एकदा मोहोर उमटवण्यासाठी सनरायझर्स हैद्राबादने (Sunrisers Hyderabad) कंबर कसली आहे. 2016 ची चॅम्पियन आणि 5 वेळा प्ले ऑफमध्ये धडक दिलेल्या सनरायझर्सचे नेतृत्व यंदा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नर याच्याकडे आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि स्थानिक खेळाडू असे जबरदस्त संतुलन असणाऱ्या सनरायझर्स हैद्राबादला यंदा विजेतेपदाचा दावेदार मानले जात आहे.
आयपीएलमध्ये 2013 ला एन्ट्री केलेल्या सनरायझर्सने 7 सिझन खेळले असून यात एकदा विजेतेपद, एकदा रनरअप आणि 5 वेळा प्ले ऑफ अशी दमदार कामगिरी केली आहे. या संघाने आतापर्यंत 108 लढती खेळल्या असून 57 विजय मिळवले तर 49 लढतीत पराभव पाहिला. तसेच दोन लढती टाय झाल्या असून यात 1 पराभव आणि 1 विजय हैद्राबादने मिळवला आहे.
IPL 2020 – सट्टा बाजारात ‘हा’ संघ फेव्हरेट, जाणून घ्या बुकींची कोणाला पसंती अन काय आहे भाव?
‘या’ खेळाडूंवर मदार
सनरायझर्स संघाने यंदा वॉर्नरकडे नेतृत्व दिले आहे. वॉर्नरने 126 लढतीत 43.17 च्या जबरदस्त सरासरीने 4,706 धावा केल्या आहेत. तर केन विलीयम्सनने 41 लढतीत 12 अर्धशकत यांच्या मदतीने 1,302 धावा केल्या आहेत. तसेच मनीष पांडे याच्यावरही फलंदाजीची जबाबदारी असणार असून 130 लढतीत त्याने 2,843 धावा केल्या आहे. यासह जॉनी बेअरस्टो, विजय शंकर आणि मोहम्मद नबी अशी फलंदाजी आहे. गोलंदाजीची कमान अनुभवी भुवनेश्वर कुमारकडे आहे. त्याला फिरकीपटू रशीद खान, सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा असा ताफा हैद्राबादकडे आहे. यासह अष्टपैलू मिशेल मार्शचा फॉर्म ही देखील जमेची बाजू आहे.
IPL 2020 – धोनीचे आयपीएलमधील अनोखे विक्रम, सातवा तर मोडणे अशक्य
कमजोरी
वॉर्नर सुरुवातीच्या काही लढतीना मुकण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे संघाचे संतुलन बनवून ठेवणे जड जाईल. तसेच रशीद खान व्यतिरिक्त अन्य चांगला फिरकीपटू संघाकडे नाही. ययूएईच्या खेळपट्ट्या फिरकीला साथ देणाऱ्या असल्याने हैद्राबाद येथे कमजोर पडत असल्याचे दिसते.
IPL 2020 – सावंतवाडीचो ‘झिल’ बॅटिने फटके मारतलो, केकेआरचो ‘नाईक’ गोलंदाजांचे कलम लावतलो
संपूर्ण संघ
डेविड वार्नर (कर्णधार), केन विलीयम्सन, मनीष पांडे, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, मिचेल मार्श, विराट सिंह, विजय शंकर, संदीप शर्मा, मोहम्मद नबी, अभिषेक शर्मा, जॉनी बेयरस्टो, ऋद्धिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, खलील अहमद, सिद्धार्थ कौल, शहबाज नदीम, बिली स्टेनलेक, बासिल थम्पी, टी. नटराजन, प्रियम गर्ग, संदीप बवानाका, अब्दुल समद, फैबियन एलन आणि संजय यादव.
IPL 2020 – चेन्नई चौथ्यांदा ‘किंग’ होणार? ‘या’ दोन महत्त्वाच्या खेळाडूंची उणीव भासणार




























































