गब्बर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अग्रस्थानी, धडाकेबाज मॅक्सवेलला टाकले मागे!

दिल्ली कॅपिटल्सचा सलामी फलंदाज शिखर धवन आयपीएलच्या 14व्या हंगामात जबरदस्त लयीत आहे. किंग्स पंजाबच्या संघाविरूद्ध धवनने 92 धावांची खेळी साकारली. धवनचे यंदाच्या हंगामाताले दुसरे अर्धशतक आहे. धवनच्या महत्तवपूर्ण खेळीने पंजाबच्या संघाचा 6 गडी राखून पराभव केला आहे.

धवन यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे, आरसीबीच्या ग्लेन मॅक्सवेलला धावांच्या क्रमवारीत मागे टाकत धवनने ऑरेंज कॅप मिळावली आहे. शिखर धवनने 3 सामन्यात 62 च्या सरासरीने 186 धावा बनवल्या आहेत, तसेच ग्लेन मॅक्सवेलने यंदाच्या हंगामात 3 सामन्यात 58.66 च्या सरासरीने 176 धावा केल्या आहेत. दोन्ही फलंदाजांच्या नावावर 2-2 अर्धशतक आहेत.

दिल्ली आणि पंजाब किंग्स चा सामना सुरू होण्याअगोदर ऑरेंज कॅप आरसीबीचा धडाकेबाज फलंदाज मॅक्सवेल याच्याकडे होती. कोलकाता नाईट रायर्डस आणि आरसीबीच्या संघादरम्यान झालेल्या लढतीत ग्लेन मॅक्सवेलने 78 धावा बनवून ऑरेंज कॅप मिळवली होती. काही तासातच शिखर धवन ऑरेंज कॅप मिळवण्यात यशस्वी ठरला.

धवन आणि मॅक्सवेल यांच्या नंतर सगळ्यात जास्त धावा पंजाब किंग्सचा कर्णधार के.एल राहूल च्या नावावर आहेत. राहूलने 3 सामन्यात 52.33 च्या सरासरीने 157 धावा बनवल्या आहेत, तसेच 2 अर्धशतक झळकावली आहेत.

आयपीएलच्या गुणतालीकेत कर्णधार विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा संघ प्रथम क्रमांकावर विराजमान आहे. आरसीबीच्या संघाने 3 सामन्यात विजय मिळवत 6 गुण नावावर आहेत, तसेच गुणतालिकेत दिल्लीचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे, 4 गुण दिल्लीच्या नावावर आहेत. मुंबई इंडियन्सचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट आरसीबीच्या हर्षल पटेलने मिळवल्या आहेत. हर्षलने 3 सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीत हर्षल पटेल प्रथम क्रमांकावर आहे. 3 सामन्यात 7 विकेट घेणारा मुंबईचा राहूल चहर पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या