IPL 2021 जेव्हा खेळली फायनल तेव्हा जिंकले विजेतेपद, असा आहे KKR चा जबरदस्त रेकॉर्ड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमिअर लीगचा अंतिम सामना सुरू होण्याच अवघ्या काही तासांचा वेळ बाकी आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स संघामध्ये हा सामना खेळला जाणार आहे. कोलकाताने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत फायनल गाठली. चेन्नईची नजर चौथ्या विजेतेपदावर तर कोलकाताची नजर तिसऱ्या विजेतेपदावर असणार आहे.

आयपीएलचा इतिहास पाहिल्यास चेन्नईचा संघ नवव्यांदा फायनलमध्ये पोहोचला आहे, तर कोलकाताचा संघ तिसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचला आहे. कोलकाताने याआधी 2012 आणि 2014 च्या मोसमामध्ये फायनलमध्ये प्रवेश केला होता. विशेष म्हणजे दोन्ही वेळेस कोलकाताने बाजी मारत आयपीएल चषक उंचावला होता. कोलकाताचा संघ जेव्हा जेव्हा फायनलला पोहोचला आहे तेव्हा तेव्हा विजेतेपद जिंकूनच आला आहे. त्यामुळे धोनीच्या संघाला सावध राहण्याची आवश्यकता आहे.

चेन्नई सुपरकिंग्ज व कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामधील आतापर्यंत झालेल्या लढतींच्या निकालावर नजर टाकल्यास यलो जर्सी परिधान करून मैदानात उतरणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या संघाचे पारडे जड आहे हे प्रकर्षाने दिसून येईल. दोन संघांमध्ये आतापर्यंत 24 लढती पार पडल्या आहेत. यापैकी 16 लढतींमध्ये चेन्नई सुपर किंग्जने यश मिळवले आहे. तसेच आठ लढतींमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने विजय मिळवला आहे.

मागील सहा लढतींपैकी पाचमध्ये विजय मिळवण्यात चेन्नई सुपरकिंग्जने बाजी मारली आहे. तसेच यंदाच्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या दोन्ही लढती जिंकण्यातही चेन्नई सुपरकिंग्ज संघ यशस्वी ठरला आहे.

या खेळाडूंवर असणार नजरा

कोलकाता नाइट रायडर्स –

सुनील नारायण
वरुण चक्रवर्ती
व्यंकटेश अय्यर
शुभमन गिल

चेन्नई सुपर किंग्ज –

ऋतुराज गायकवाड
रॉबिन उथप्पा
शार्दुल ठाकूर
रवींद्र जाडेजा

उभय संभाव्य संघ खालीलप्रमाणे

कोलकाता नाइट रायडर्स –

शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, ओएन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), सुनील नारायण, शाकीब उल हसन, लॉकी फर्ग्युसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.

चेन्नई सुपरकिंग्ज –

ऋतुराज गायकवाड, फाफ डय़ुप्लेसिस, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार, यष्टिरक्षक), रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जोश हेझलवूड.

आयपीएल फायनल लढत आज

कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध
चेन्नई सुपरकिंग्ज
दुबई, रात्री 7.30 वाजता