IPL 2021 – धोनीची चलाखी पाहून तिनं आधीच म्हटलं होतं, याच ‘चेंडूवर सामना जिंकणार’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
dhoni-fielding

सध्या आयपीएलची धूम सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) फाफ डुप्लेसी (Faf du Plessis) आणि ऋतुराज गायकवाड यांच्या (Ruturaj Gaikwad) अर्धशतकी खेळीनंतर दीपक चाहरच्या (Deepak Chahar) जबरदस्त स्पेलमुळे इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या रोमांचक टी20 सामन्यात कोलकाता नाइट राइडर्सला (KKR) 18 धावांनी पराभूत करत सलग तिसरा विजय निश्चित केला. नेहमी पाहिलं जातं की धोनी (MS Dhoni) आपल्यातील कर्णधाराच्या कौशल्याने कोणत्याही क्षणी सामना आपल्याकडे वळवतात. आताही असंच काहीसं झालं आहे. केकेआरला (KKR) शेवटच्या षटकात 20 धावा हव्या होत्या. एमएस धोनीने (MS Dhoni) षटकाच्याआधी कडक फिल्डिंग लावली. टीव्ही पाहणारी मुलगी बोलली- ‘याच चेंडूवर मॅच जिंकणार.’ सोशल मीडिया (Social Media) वर व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे.

शेवटच्या षटकात केकेआरला 20 धावा आवश्यक होत्या. त्याने शार्दुल ठाकुरला गोलंदाजी दिली आणि स्वत: अगदी कडक फिल्डिंग लावली. टीव्हीवर धोनीच्या फिल्डिंगचं फुटेज सुरू होतं. हे पाहून धोनीची चालाखी ती मुलगी समझली आणि म्हणाली ‘याच चेंडूवर सामना जिंकू…’ यानंतर लगेच धावबाद झाला आणि चेन्नई सुपर किंग्सने सामना जिंकला.

गेल्या दोन सामन्यांमध्ये जिंकल्यानंतर चेन्नईचा आत्मविश्वास चागंलाच वाढला आहे.

डुप्लेसीच्या नाबाद 95 धावा आणि गायकवाडच्या 64 धावांच्या जोरावर तीन विकेटवर 220 धावांचा डोंगर उभा केला. कोलकाता नाइट राइडर्सकडून पॅट कमिंस नाबाद 66 धावा, आंद्रे रसलच्या 54 धावा आणि दिनेश कार्तिकच्या 40 धावा केल्या. मात्र तरीही 19.1 षटकात 202 धावांवर संघ तंबूत परतला.

कोलकाताचा हा सलग तिसरा पराभव होता. खराब सुरुवात झाल्यानंतरही त्यांनी शेवटच्या षटकापर्यंत सामना खेचला.