IPL 2023 पार्नेलच्या माऱ्यापुढे राजस्थानचा 59 धावांत खुर्दा, बंगळुरूच्या आशा कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्ले ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱया सामन्यात बंगळुरूने राजस्थानचा अवघ्या 59 धावांमध्ये खुर्दा पाडत 112 धावांनी दणदणीत विजय मिळविला आणि आपल्या ‘प्ले ऑफ’च्या आशा पल्लवित ठेवल्या. मात्र या पराभवामुळे गत उपविजेत्या राजस्थानवर साखळीतच बाद होण्याचे संकट ओढवले आहे.

यंदाच्या आयपीएल मोसमात ‘प्ले ऑफ’ची शर्यत दिवसेंदिवस अधिक रंगत होत चालली आहे. आयपीएलचे साखळी सामने अंतिम टप्यात आले असले तरी अद्याप कोणत्याही संघाला प्ले ऑफचे तिकीट मिळालेले नाही. आजचा सामना हा बंगळुरू आणि राजस्थानसाठी ‘करो या मरो’ स्थितीतला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजीचे द्वंद्व पाहण्याची संधी लाभेल अशी अपेक्षा होती. नाणेफेक जिंकून बंगळुरूने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरूची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. विराट कोहली 18 धावा करून तंबूत परतला. मात्र कर्णधार डय़ु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी बंगळुरूच्या धावसंख्येला आकार दिला. डय़ु प्लेसिसने 44 चेंडूंत 3 चौकार 2 षटकारांच्या मदतीने 55 धावा केल्या, तर मॅक्सवेलने 33 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 54 धावा केल्या. डय़ु प्लेसिस आणि मॅक्सवेल यांच्या खेळीच्या जोरावर बंगळुरूने 171 धावांचा टप्पा गाठला.

राजस्थानकडे असलेले यशस्वी जैसवाल, जॉस बटलर, संजू सॅमसंग असे तगडे फलंदाज पाहता 172 धावांचे आव्हान तोकडे वाटत होते, मात्र प्रत्यक्ष चित्र काही उलटेच पाहायला मिळले. आजच्या सामन्यात जैस्वाल, बटलर यांना भोपळाही पह्डता आला नाही, तर सॅमसंग अवघ्या 4 धावा करून डगआऊटमध्ये परतला. त्यानंतर राजस्थानच्या फलंदाजीला अक्षरशः ग्रहण लागले. बंगळुरूचे वेन पार्नेल, मिचेल ब्रेसवेल, करण शर्मा यांच्या भेदक माऱयापुढे राजस्थानची फलंदाजी तग धरू शकली नाही. ज्यो रूट आणि हेटमायर वगळता इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्यादेखील गाठता आली नाही. त्यामुळे राजस्थानचा संघ अवघ्या 59 धावांमध्येच तंबूत परतला. या 59 धावांमध्ये हेटमायरने एकटय़ाने 35 धावांचे योगदान दिले. पार्नेल याने 3 षटकांत 10 धावा देत 3 विकेट घेतल्य़ा

10 षटकांत पालापाचोळा

यंदाच्या आयपीएल मोसमात राजस्थानने काही सामन्यांमध्ये 200 धावांचा पाठलाग अगदी सहजपणे केला आहे. राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैसवाल हा कमालीचा फॉर्मात असून त्याला संजू सॅमसंग, जोस बटलर, हेटमायर यांची उत्तम साथ लाभत आहे. मात्र आजच्या सामन्यात बटलर, जैस्वाल शून्यावर बाद झाल्यानंतर अवघ्या 10 षटकांत राजस्थानचा संघ तंबूत परतला. राजस्थानच्या संघाचा अवघ्या 59 धावांत पालापाचोळा झाला.