आयपीएलचा अंतिम सामना चेन्नईमध्ये; संपूर्ण वेळापत्रकाची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानातील लोकसभा निवडणुकीची तारीख ठरत नसल्यामुळे रखडलेल्या आयपीएलच्या संपूर्ण वेळापत्रकाची घोषणा बीसीसीआयकडून मंगळवारी करण्यात आली. 23 मार्चपासून चेन्नईत सुरू होणाऱ्या या स्पर्धेच्या जेतेपदाचा फैसला 12 मे रोजी चेन्नईतच होणार आहे. याप्रसंगी 5 मेपर्यंतच्या लढतींची घोषणा करण्यात आली. प्ले ऑफच्या लढतींबाबत अधिकृतपणे अद्याप सांगण्यात आलेले नाही. मात्र या स्पर्धेतील सर्व लढती हिंदुस्थानात आयोजित करण्यात येणार आहेत हेही आज स्पष्ट झाले. 11 एप्रिल ते 23 मे या कालावधीत लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम असणार आहे. त्यानुसार बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर केले आहे.

… म्हणून प्ले ऑफच्या लढतींवर शिक्कामोर्तब नाही

बीसीसीआयने अंतिम सामना 12 मे रोजी चेन्नईत होणार हे स्पष्ट केले असले तरी प्ले ऑफ लढतींबाबत घोषणा करण्यात आलेली नाही. लोकसभा निवडणुकीमुळे त्यांनी कदाचित हे केले असावे. तसेच विशाखापट्टणम हे स्टेडियमही पर्यायी म्हणून ठेवण्यात आले आहे. 7 मे (पहिली क्वॉलिफायर), 8 मे (एलिमिनेटर) व 10 मे (दुसरी क्वॉलिफायर) या दरम्यान प्ले ऑफ लढती होण्याची शक्यता आहे.

घरच्या मैदानावर सात सामने खेळणार

बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार प्रत्येक संघ घरच्या मैदानावर सात सामने खेळणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे मुंबई व कोलकाता येथील लढती इतरत्र खेळवण्यात येतील अशी शक्यता निर्माण झाली होती, पण बीसीसीआयकडून अशाप्रकारचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

रात्रीचे सामने आठ वाजताच होतील

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आयपीएलच्या रात्रीच्या सामन्यांच्या वेळामध्ये बदल होतील अशी चिन्हं निर्माण झाली होती, पण सायंकाळचे सामने 4 आणि रात्रीचे सामने 8 वाजता होणार असल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आणि शंकाकुशंकाना पूर्णविराम मिळाला.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या लढती

24 मार्च : मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई

3 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई

10 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, मुंबई

13 एप्रिल: मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई

15 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई

2 मे : मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, मुंबई

5 मे : मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट राइडर्स, मुंबई