IPL2020 – सट्टेबाजी, भ्रष्टाचार रोखण्यासाठी ऍण्टी करप्शन युनिट लागली कामाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदाचा आयपीएल मोसम यूएईत होणार आहे. या स्पर्धेत सट्टेबाजी, भ्रष्टाचार यांसारख्या क्रिकेटला काळा डाग लावणाऱया घटना घडू नये यासाठी बीसीसीआयची ऍण्टी करप्शन युनिट मंगळवारी यूएईत पोहोचली आहे. अजित सिंह यांच्या नेतृत्वाखाली सहा जणांची ही टीम यूएईतील आयपीएलशी निगडित सर्व घडामोडींवर लक्ष ठेवणार आहे. यावेळी प्रत्येक संघांतील खेळाडूंना यापासून दूर ठेवण्यासाठी त्यांना ऑनलाइन मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

सहा दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीनंतर ही युनिट कामाला लागणार आहे. यावेळी अजित सिंह म्हणाले, आयपीएलमध्ये भ्रष्टाचार किंवा सट्टेबाजी घडू नये यासाठी आम्ही स्पोर्टस् इंटिग्रिटी युनिटचाही समावेश केला आहे. यांच्या मदतीने स्पर्धेवर बारकाईने लक्ष ठेवता येणार आहे. तसेच आयपीएलमध्ये सहभागी होणाऱया प्रत्येक खेळाडूला थेट मार्गदर्शन न करता प्रत्येक संघाला एका वेळी बोलावून त्यांना धडे देणार आहोत. सट्टेबाज खेळाडूंशी व्हॉटस्ऍप व सोशल मीडियाद्वारे संवाद साधू शकतात. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.