
सामना ऑनलाईन । मुंबई
प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन कडे गूड न्यूज असल्याची चर्चा सध्या बीटाऊन व तिच्या चाहत्यांमध्ये रंगली आहे. विद्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असून त्या व्हिडीओवरून ही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे खरंच विद्या प्रेग्नेंट आहे की नेहमी प्रमाणे ही देखील पोकळ चर्चा आहे हे लवकरच समजेल.
विद्या बालन हिचे 2012 ला प्रसिद्ध निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर सोबत लग्न झाले आहे. तेव्हापासून अनेकवेळा विद्या गरोदर असल्याच्या अफवा उठल्या आहेत. विद्याच्या वाढत्या वजनावरूनही काहिंनी ती गरोदर असल्याचा तर्क लावला होता. मात्र प्रत्येकवेळी विद्याने यावर कोणतीही प्रतिक्रीया न देता शांत राहणं पसंत केलं आहे.
विद्या सध्या तिचा आगामी चित्रपट मिशन मंगलच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटात तिने इस्त्रोमधील शास्त्रज्ञाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी, नित्या मेनन आणि किर्ती कुल्हाडी देखील मुख्य भूमिकांमध्ये आहेत.























































